सव्वातीन कोटींचे घड्याळ!

वॉशिंग्टन : स्टायलिश, युनिक आणि महागड्या घड्याळांसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या जेकब अँड कंपनीने अलीकडेच अतिशय महागडे मनगटी घड्याळ लाँच केले असून, या घड्याळाची किंमत चक्क सव्वातीन कोटींच्या घरात आहे. या घड्याळाच्या किमतीत अगदी मेट्रो शहरातदेखील किमान दोन आलिशान फ्लॅट खरेदी करता येत असताना कोणी हे घड्याळ कशाला विकत घेईल, अशा प्रतिक्रिया काही नेटिझन्सनी व्यक्त केल्या … The post सव्वातीन कोटींचे घड्याळ! appeared first on पुढारी.

सव्वातीन कोटींचे घड्याळ!

वॉशिंग्टन : स्टायलिश, युनिक आणि महागड्या घड्याळांसाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या जेकब अँड कंपनीने अलीकडेच अतिशय महागडे मनगटी घड्याळ लाँच केले असून, या घड्याळाची किंमत चक्क सव्वातीन कोटींच्या घरात आहे. या घड्याळाच्या किमतीत अगदी मेट्रो शहरातदेखील किमान दोन आलिशान फ्लॅट खरेदी करता येत असताना कोणी हे घड्याळ कशाला विकत घेईल, अशा प्रतिक्रिया काही नेटिझन्सनी व्यक्त केल्या आहेत.
जेकब अँड कंपनीने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. एक मिनी रिक्रिएशन म्हणून हे घड्याळ आम्ही निर्मिले असून त्याला एलिगेटर स्ट्रॅप व 18 कॅरेट रोज गोल्ड फोल्डिंग क्लॅस्प जोडले गेले आहे, असे यात त्यांनी म्हटले आहे. घड्याळात ग्रिलच्या बरोबरीने क्रिस्टल डायल व मगरीच्या कातड्यापासून तयार केलेल्या चामड्याचे बेल्टदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे, असे कंपनीने या पोस्टमध्ये पुढे नमूद केले आहे.
अर्थात, या घड्याळाची किंमत चक्क सव्वातीन कोटी इतकी अव्वाच्या सव्वा असल्याने त्यावर प्रतिक्रियाही तितक्याच जोरदार उमटत आहेत. एका युजरने थेट कंपनीला विचारले, यात वेळ कुठे पाहू? आणखी एक युजर अगदी दिलखुलास अंदाजात म्हणाला, सौदी अरेबियाच्या राजासाठी अतिशय उत्तम घड्याळ!
Latest Marathi News सव्वातीन कोटींचे घड्याळ! Brought to You By : Bharat Live News Media.