नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर अहमदनगर शहर अहिल्यानगर या नावाने ओळखले जाणार- देवेंद्र फडणवीस

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर अहमदनगर शहर अहिल्यानगर या नावाने ओळखले जाणार- देवेंद्र फडणवीस

आज अहमदनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी महायुतीने सभा घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री या सभेत उपस्थित असून त्यांनी सभेला संबोधित केले असून ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आल्यावर अहमदनगर शहराचे नाव अहिल्यानगर होणारच .

ते म्हणाले मी पंतप्रधान मोदींचे अहिल्यानगर मध्ये स्वागत करतो. 2014 आणि 2019 मध्ये जेवढी गर्दी सभेला झाली होती त्या पेक्षा जास्त गर्दी या वेळी झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय झाला असून मोदी पुन्हा पंतप्रधान झाले की त्यांच्या आशीर्वादाने अहमदनगर चे नाव अहिल्या नगर होईल. 

दुष्काळी भागाला निळवंडे धरणातून पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या अहमदनगर जिल्ह्याला देशातील 4 महामार्ग जोडले असून या जिल्ह्यात 4 एमआयडीसी होणार असून या जिल्ह्याची ओळख औद्योगिक जिल्हा म्हणून होईल. 

 

Edited By- Priya Dixit 

 

Go to Source