Accident : मराठा स्वयंसेवकात शोककळा, युवकाचा अपघाती मृत्यू

Accident : मराठा स्वयंसेवकात शोककळा, युवकाचा अपघाती मृत्यू

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. मनोज जरांगे पाटील यांची राज्यात ठीक ठिकाणी सभा होत आहे. मनोज जरांगे यांची येत्या 8 डिसेंबर रोजी कंधार या ठिकाणी सभा होणार आहे. या सभेसाठी लोहा तालुक्यातून  मराठा समाजाच्या बांधवांकडून जमा झालेली देणगी आणि या सभेत उपस्थित राहणाऱ्या स्वयंसेवकांची यादी घेऊन निघालेल्या युवकाचा मोटारसायकलच्या धडकेत अपघाती मृत्यू झाला .बालाजी नारायण जाधव(45) असे या मृत्युमुखी झालेल्या युवकाचे नाव आहे. 

 

मयत बालाजी हे लोहा तालुक्यातील चौंडी गावातील राहणारे असून मराठा समाजाच्या बांधवांकडून एकत्र झालेली देणगी आणि सभेसाठी उपस्थित राहणाऱ्या स्वयंसेवकांची यादी घेऊन कंधारसाठी निघाले असताना कंधार तालुक्यातील बाळंतवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या मोटारसायकल ची जोरदार धडक झाली त्यात मोटारसायकलचा चक्काचूर झाला आणि बालाजी हे जागीच ठार झाले. या अपघातात गुलाब लक्ष्मण गीते (27) राहणार नागदरवाडी तालुका लोहा हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. 

सध्या मनोज जरांगे हे मराठा बांधवाना आरक्षण मिळावे अशी मागणी घेऊन आंदोलन करत आहे. या साठी ते राज्यभर दौरा करत सभा घेत आहे. त्यांचा सभा नांदेड जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी होणार आहे. त्यांची कंधारच्या शिवाजी स्कूल पटांगणात पानभोसी रोडवर येत्या 8 डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेसाठी बालाजी देणगी आणि सभासदांची यादी घेऊन निघाले असताना अपघातात ते मृत्युमुखी झाले. त्यांच्या अपघाती निधनाने मराठा स्वयंसेवकात शोककळा पसरली आहे. 

 Edited by – Priya Dixit  

सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. मनोज जरांगे पाटील यांची राज्यात ठीक ठिकाणी सभा होत आहे. मनोज जरांगे यांची येत्या 8 डिसेंबर रोजी कंधार या ठिकाणी सभा होणार आहे. या सभेसाठी लोहा तालुक्यातून मराठा समाजाच्या बांधवांकडून जमा झालेली देणगी आणि या …

Go to Source