सावंतवाडीत 21 जून रोजी अभंग गायन स्पर्धा

सावंतवाडीत 21 जून रोजी अभंग गायन स्पर्धा

राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ यांचे आयोजन

सावंतवाडी
राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्ग आणि सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार 21 जून 2024 रोजी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन सायंकाळी 4.30 वाजता सावंतवाडी विठ्ठल मंदिरात करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रुपये1500, द्वितीय पारितोषिक 1000 रुपये, तृतीय पारितोषिक 700 रुपये, तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय पारितोषिक 500 रुपये आहे. प्रथम नाव नोंदणी केलेल्या केवळ 20 स्पर्धकांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या मुला मुलींनी आपली नाव नोंदणी मधुरा खानोलकर 8669289041 या क्रमांकावर नोंदवावीत असे आवाहन राधा रंग फाउंडेशन सिंधुदुर्ग व सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडीतर्फे करण्यात आले आहे.