विवाहापूर्वी युवतीचे करतात अपहरण

विवाहापूर्वी युवतीचे करतात अपहरण

100 दिवसांपर्यंत शरीरावर लावतात वाळू
नामीबियात राहणाऱ्या हिंबा समुदायामध्ये अत्यंत प्रथा पाळली जाते. तेथे विवाहापूर्वी युवतीचे अपहरण केले जाते. तेथे तिला 100 दिवसांपर्यंत एका खोलीत कैद केले जाते, त्यादरम्यान तिच्या शरीरावर लाल वाळू लावली जाते.
या समुदायात नियोजित वधूला विवाहापूर्वीच उचलून नेले जाते. नियोजित वराचे कुटुंब या युवतीला स्वत:च्या घरात एका वेगळ्या खोलीत ठेवतात आणि तिच्या खाण्यापिण्याची आणि कपड्यांची काळजी घेतात. याचबरोबर युवतीला 100 दिवसांपर्यंत कैद ठेवावे लागते. यादरम्यान तिला स्वत:च्या शरीरावर लाल वाळू लावुन रहावे लागते.
या समुदायाच्या महिला आयुष्यात केवळ एकदाच स्नान करतात. हे स्नान देखील विवाहाच्या दिवशी केले जाते. याचबरोबर त्या पाण्याचा वापर करून कपडे देखील धुवू शकत नाहीत. या महिला स्वत:ला साफ करण्यासाठी जडीबूटींचा वापर करतात. या वनौषधींना पाण्यात उकळवून त्याची वाफ घेत महिला स्वत:चे शरीर स्वच्छ करतात. यामुळे महिलांच्या शरीराला दुर्गंधी येत नाही.