कणकुंबी तपासनाक्यावर बस प्रवाशाकडून आठ लाख जप्त

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकुंबी तपासनाक्यावर शुक्रवारी सकाळी वाहने अडवून तपासणी करताना एका बसप्रवाशाकडे 7 लाख 98 हजार रुपये आढळून आले आहेत. तपासनाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. एसएसटी पथकातील अधिकारी मलगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून बेळगावकडे येणारी केए 29, एफ 1532 क्रमांकाची बस अडवून […]

कणकुंबी तपासनाक्यावर बस प्रवाशाकडून आठ लाख जप्त

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकुंबी तपासनाक्यावर शुक्रवारी सकाळी वाहने अडवून तपासणी करताना एका बसप्रवाशाकडे 7 लाख 98 हजार रुपये आढळून आले आहेत. तपासनाक्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही रक्कम जप्त केली आहे. एसएसटी पथकातील अधिकारी मलगौडा पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास गोव्याहून बेळगावकडे येणारी केए 29, एफ 1532 क्रमांकाची बस अडवून तपासणी केली असता संजय बसवराज रे•ाr, रा. वण्णूर, ता. बैलहोंगल यांच्याकडे 7 लाख 98 हजार रुपये आढळून आले.
कागदपत्रे नसल्यामुळे कारवाई
अधिकाऱ्यांनी या रकमेचे मूळ विचारून मोठी रक्कम वाहतूक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, या प्रवाशाकडे यासंबंधी कसलीच कागदपत्रे नसल्यामुळे 7 लाख 98 हजार रुपये जप्त करून सरकारी खजान्यात ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे.