तब्बल नऊ लाखांचा बनावट दारूसाठा जप्त

सीसीबीच्या अधिकाऱ्यांची कारवाई : मुंबईतून पुरवठा : विनायकनगर-हिंडलगा येथील तरुण ताब्यात बेळगाव : लक्ष्मीनगर, हिंडलगाजवळ गुरुवारी सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी 9 लाखांची बेकायदा दारू जप्त केली आहे. याप्रकरणी विनायकनगर-हिंडलगा येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. महागडी दारू स्वस्तात पुरविणाऱ्या या युवकाच्या जबानीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली असून मुंबईतून बनावट दारूची वाहतूक केली जात असल्याचे सामोरे आले […]

तब्बल नऊ लाखांचा बनावट दारूसाठा जप्त

सीसीबीच्या अधिकाऱ्यांची कारवाई : मुंबईतून पुरवठा : विनायकनगर-हिंडलगा येथील तरुण ताब्यात
बेळगाव : लक्ष्मीनगर, हिंडलगाजवळ गुरुवारी सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी 9 लाखांची बेकायदा दारू जप्त केली आहे. याप्रकरणी विनायकनगर-हिंडलगा येथील एका युवकाला अटक करण्यात आली आहे. महागडी दारू स्वस्तात पुरविणाऱ्या या युवकाच्या जबानीतून धक्कादायक माहिती उघडकीस आली असून मुंबईतून बनावट दारूची वाहतूक केली जात असल्याचे सामोरे आले आहे. पोलीस आयुक्त इडा मार्टिन, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलीस निरीक्षक देवेंद्र धूळखेड, के. व्ही. चरलिंगमठ, महेश वडेयर, गजानन शिरसंगी, संतोष पाटील, महेश पाटील, यासीन नदाफ आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. राजेश केशव नायक (वय 41) रा. विजयनगर-हिंडलगा असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याजवळून गोवा बनावटीसह विविध कंपन्यांची 186.5 लिटर बेकायदा दारू जप्त करण्यात आली आहे. याची किंमत 9 लाख 9 हजार 750 रुपये इतकी होते. दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दीड लाख रुपये किमतीची कार, 350 रुपये रोख रक्कम असा एकूण 10 लाख 60 हजार 100 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी कार अडवून तपासणी केली असता वेगवेगळ्या कंपन्यांचा महागडा दारूसाठा कारमध्ये आढळून आला. यामध्ये काही गोवा बनावटीचा तर महागड्या स्कॉच त्याने मुंबईहून मागविल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी याच युवकाला अटक करून सदाशिवनगर येथे बनावट दारू बनवणाऱ्या अ•dयावर छापा टाकला होता.
महागड्या दारूच्या बाटलीत स्वस्त दारू भरून विक्री
महागड्या दारूच्या बाटल्यात तुलनेने स्वस्त दारू भरून त्याची विक्री केली जात होती. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. त्यानंतरही राजेश नायकने आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे. सध्या मुंबई येथून बनावट दारू मागवून त्याची विक्री केली जात होती. महागड्या कंपन्यांच्या बाटल्यात स्वस्त दारू भरून त्याची बेळगावात विक्री केली जाते. सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी राजेशला अटक करून मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू जप्त केली आहे.
डझनाहून अधिक गुन्हे
सध्या कॅम्पचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले अल्ताफ मुल्ला यांनी सीसीबीत असताना 20 जुलै 2023 रोजी राजेश नायकच्या अ•dयावर छापा टाकला होता. सदाशिवनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये बॉटलिंग केले जात होते. त्याचाही पोलिसांनी छडा लावला होता. त्यावेळी सुमारे 4 लाख रुपये किमतीचा बनावट दारूसाठा जप्त केला होता. राजेश नायक व त्याचा साथीदार हसन बेपारी (वय 22) रा. उज्ज्वलनगर या दोघा जणांवर एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही राजेशने बेकायदा व बनावट दारूचा व्यवसाय सुरूच ठेवला असून त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्थानकात बाराहून अधिक गुन्हे नोंद आहेत.