डेटिंग अॅपवरील चॅट युवकाला पडले महागात

डेटिंग अॅपवरील चॅट युवकाला पडले महागात

चार वर्षात 1 कोटी 35 लाखांना लुटले : वेर्णा पोलिसस्थानकात तिघांविऊद्ध गुन्हा
वास्को : अश्लील व्हिडियो समाज माध्यमांवर व्हायरल करण्याचे भय दाखवून आरोसी कासांवलीतील एका व्यक्तीला 1 कोटी 35 लाख रूपयांना लुटण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात झीता फर्नांडिस, मारी फर्नांडिस व शंकर जाधव अशा तिघांविऊद्ध वेर्णा पोलिसांनी गुन्हे नोंद पेले आहेत. गेली चार वर्षे सदर त्रिकुट पीडित युवकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून लाखो रूपये वसुल करीत होते. वास्कोतील पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार आरोसी कासावलीतील बॉस्को फर्नांडिस या युवकाने याप्रकरणी पोलीस तक्रार केलेली आहे. या गुन्ह्यात अडकलेल्या दोन महिला व एक पुरूष हे कर्नाटकातील असून या तिघांनी तक्रारदार व्यक्तीला तुझा अश्लील व्हिडियो व्हायरल करू अशी भीती दाखवत त्याला 1 कोटी 35 ऊपयांना लुटले. संशयित आरोपींनी केलेल्या मागणीनुसार तक्रारदाराने वेळोवेळी त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर लाखों रूपये जमा केले. तक्रारदार युवक विदेशात जहाजावर नोकरी करणारा असून शेवटी या त्रासातून सुटका करण्यासाठी त्याने वेर्णा पोलीस स्थानकात तक्रार नोंद केली. त्यानुसार वेर्णा पोलिसांनी त्या तिघांविऊद्ध गुन्हा नोंद केला आहे. वेर्णा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. तक्रारदाराने ज्या व्यक्तींची नावे संशयित म्हणून दिलेली आहेत त्या त्याच व्यक्ती आहेत की त्या अन्य कुणी आहेत, याचाही तपास पोलीस करीत आहेत. तक्रारदाराला ब्लॅकमेल करण्याचा हा प्रकार 2020 पासून सुरू होता. हा प्रकार डेटींग अॅपवर एका महिलेशी झालेल्या चॅटच्या माध्यमातून घडलेला आहे. लोक लज्जेस्तव पीडित युवकाने मागची चार वर्षे पोलीस तक्रार केली नव्हती. दरम्यान, अशा प्रकारे लोकांना लुटण्याचे प्रकार वाढत असून लोकांनी अशा भामट्यांपासून सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.