कुडची येथे टेम्पोसह 38 एलईडी टीव्ही जप्त
तपासनाक्यावर 9 लाख 86 हजारांच्या मुद्देमालावर कारवाई
वार्ताहर /कुडची
कुडची मतदारसंघात टेम्पोतून घेऊन जात असलेल्या 9 लाख 86 हजार रुपये किमंतीच्या एलईडी टीव्ही जप्त करण्यात आल्या. कुडची येथे भरारी पथकाने ही कारवाई केली. सदर टेम्पोमध्ये 38 टीव्ही होत्या. यावेळी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी करण्यात येत आहे. याबाबत माहिती अशी, कुडची विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. कुडची गावामध्ये मंगळवारी रात्री एका लहान टेम्पोतून एलईडी टीव्ही घेऊन जात असताना भरारी पथकाने पकडले. त्यांच्याकडे या टीव्हींबद्दल कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणतीही पावती नव्हती. त्यानंतर प्राप्तिकर खात्याने याची चौकशी केली. याबद्दल माहिती नसल्याने प्राप्तिकर खात्याने चेकपोस्टवरील कर्मचारी व भरारी पथकाला पाचारण करून या टीव्ही जप्त करण्याची कार्यवाही केली. 9 लाख 86 हजार 480 रुपये किमतीच्या 38 एलईडी टीव्ही आढळल्या. त्या तात्काळ पोलीस, भरारी पथक व निवडणूक अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या. याप्रकरणी नईम दादापीर कोतवाल याला ताब्यात घेण्यात आले आहे. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
Home महत्वाची बातमी कुडची येथे टेम्पोसह 38 एलईडी टीव्ही जप्त
कुडची येथे टेम्पोसह 38 एलईडी टीव्ही जप्त
तपासनाक्यावर 9 लाख 86 हजारांच्या मुद्देमालावर कारवाई वार्ताहर /कुडची कुडची मतदारसंघात टेम्पोतून घेऊन जात असलेल्या 9 लाख 86 हजार रुपये किमंतीच्या एलईडी टीव्ही जप्त करण्यात आल्या. कुडची येथे भरारी पथकाने ही कारवाई केली. सदर टेम्पोमध्ये 38 टीव्ही होत्या. यावेळी त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. याप्रकरणी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून चौकशी करण्यात येत आहे. […]