घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आणखी दोघांना अटक
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात (Ghatkopar Hoarding Case) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीने इगो मीडियाची पूर्व संचालक जान्हवी मराठेला अटक केली. जान्हवी मराठेसह कंत्राटदार सागर कुंभारला देखील पोलिसांनी अटक केली आहे. गोव्यामधून या दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या इगो मीडिया कंपनीची पूर्व संचालक जान्हवी मराठेला पोलिसांनी अटक केली आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्यापासून गुन्हे शाखेचे अधिकारी जान्हवीच्या मागावर होते. अखेर गोव्यातून गुन्हे शाखेच्या पथकाने तिला अटक केली. जान्हवीसोबत कंत्राटदार सागर कुंभारला देखील पोलिसांनी अटक केली.घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेलं होर्डिंग बांधल्याचा सागर कुंभारवर आरोप आहे. रविवारी जान्हवी मराठे आणि सागर कुंभारला कोर्टात हजर केले जाणार आहे. जान्हवी मराठे ही डिसेंबर २०२३ पर्यंत इगो मीडियाची संचालक होती. याच काळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेले होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे याप्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आता या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.मुंबईमध्ये 13 मे रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 74 जण जखमी झाले होते. याप्रकरणी घटनेच्या तिसऱ्या दिवशी मुख्य आरोपी भावेश भिंडेला पोलिसांनी राजस्थानच्या जयपूरमधून अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात पोलिसांनी मनोज संघु नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला अटक केली होती. सध्या हे दोघेही पोलिस कोठडीत आहेत.हेही वाचावरिष्ठ IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या
मुंबई बॉम्बस्फोटातील दोषीची तुरुंगात हत्या
Home महत्वाची बातमी घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आणखी दोघांना अटक
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आणखी दोघांना अटक
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात (Ghatkopar Hoarding Case) मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीने इगो मीडियाची पूर्व संचालक जान्हवी मराठेला अटक केली. जान्हवी मराठेसह कंत्राटदार सागर कुंभारला देखील पोलिसांनी अटक केली आहे. गोव्यामधून या दोघांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या इगो मीडिया कंपनीची पूर्व संचालक जान्हवी मराठेला पोलिसांनी अटक केली आहे. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जमीन फेटाळल्यापासून गुन्हे शाखेचे अधिकारी जान्हवीच्या मागावर होते. अखेर गोव्यातून गुन्हे शाखेच्या पथकाने तिला अटक केली. जान्हवीसोबत कंत्राटदार सागर कुंभारला देखील पोलिसांनी अटक केली.
घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेलं होर्डिंग बांधल्याचा सागर कुंभारवर आरोप आहे. रविवारी जान्हवी मराठे आणि सागर कुंभारला कोर्टात हजर केले जाणार आहे. जान्हवी मराठे ही डिसेंबर २०२३ पर्यंत इगो मीडियाची संचालक होती. याच काळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेले होर्डिंग उभारण्यात आले होते. त्यामुळे याप्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून आता या दोघांची कसून चौकशी सुरू आहे.
मुंबईमध्ये 13 मे रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला होता. या पावसामुळे घाटकोपरच्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर भलेमोठे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेमध्ये 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. 74 जण जखमी झाले होते. याप्रकरणी घटनेच्या तिसऱ्या दिवशी मुख्य आरोपी भावेश भिंडेला पोलिसांनी राजस्थानच्या जयपूरमधून अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात पोलिसांनी मनोज संघु नावाच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरला अटक केली होती. सध्या हे दोघेही पोलिस कोठडीत आहेत.हेही वाचा
वरिष्ठ IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्यामुंबई बॉम्बस्फोटातील दोषीची तुरुंगात हत्या