स्प्लेंडर मोटारसायकलची देशपांडे गल्लीतून चोरी

स्प्लेंडर मोटारसायकलची देशपांडे गल्लीतून चोरी

बेळगाव : बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्यांबरोबरच दुचाकी चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. रविवारी दुपारी देशपांडे गल्ली येथून एक मोटारसायकल चोरण्यात आली असून चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. बसवण गल्ली, मंडोळी येथील आनंद यल्लाप्पा पाटील हे रविवारी खरेदीसाठी बाजारात गेले होते. गणपत गल्ली परिसरात जाण्यापूर्वी देशपांडे गल्ली येथे त्यांनी आपली केए 22, यु 5546 क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल उभी केली होती. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास दोघा अज्ञातांनी मोटारसायकल चोरल्याचे उघडकीस आले आहे. आनंद यांनी तातडीने खडेबाजार पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. चोरीचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून दोघा अज्ञातांनी मोटारसायकल चोरल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी एकाने आपल्या अंगावर रेनकोट परिधान केला होता. सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.