येळ्ळूरच्या एका खटल्यात चार्जफ्रेम

बेळगाव : येळ्ळूर खटल्याची सुनावणी सोमवारी होती. या खटल्यामध्ये चार्जफ्रेम झाले असून आता या खटल्याच्या सुनावणीला नियमित प्रारंभ होणार आहे. खटला क्रमांक 126 च्या सुनावणीमध्ये एकूण 24 जण असून ते सारे सोमवारी हजर होते. त्यामुळे न्यायालयाने चार्जफ्रेम केले असून गैरहजर राहिलेल्या कार्यकर्त्यांचा खटला मात्र स्वतंत्रपणे सुरू करण्यात येणार आहे. येळ्ळूर येथील वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ […]

येळ्ळूरच्या एका खटल्यात चार्जफ्रेम

बेळगाव : येळ्ळूर खटल्याची सुनावणी सोमवारी होती. या खटल्यामध्ये चार्जफ्रेम झाले असून आता या खटल्याच्या सुनावणीला नियमित प्रारंभ होणार आहे. खटला क्रमांक 126 च्या सुनावणीमध्ये एकूण 24 जण असून ते सारे सोमवारी हजर होते. त्यामुळे न्यायालयाने चार्जफ्रेम केले असून गैरहजर राहिलेल्या कार्यकर्त्यांचा खटला मात्र स्वतंत्रपणे सुरू करण्यात येणार आहे. येळ्ळूर येथील वेशीतील ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक हटविल्यानंतर येळ्ळूरच्या जनतेला अमानुष मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर येळ्ळूरच्या जनतेवरच विविध खटले दाखल करण्यात आले. यामधील खटला क्रमांक 126 ची सुनावणी सुरू झाली आहे. यामध्ये अर्जुन गोरल, चांगदेव देसाई, अनंत चिठ्ठी, वृशसेन पाटील, संभाजी हट्टीकर, शिवाजी कदम, सुनील धामणेकर, श्रीकांत नांदुरकर, राहुल कुगजी, नागेश बोबाटे, सुनील कुंडेकर, रवळू कुगजी, केशव हलगेकर, गणपती पाटील, नामदेव नायकोजी, केशव पाटील, रमेश धामणेकर, रामचंद्र कुगजी, सतीश कुगजी यांचा समावेश आहे. येथील जेएमएफसी द्वितीय न्यायालयामध्ये सुनावणी होती. हे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने चार्जफ्रेम करण्यात आले आहे. या सर्वांच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शाम पाटील, अॅड. हेमराज बेंचन्नावर हे काम पाहत आहेत.