मजगावच्या शेतकऱ्यांवर दुबार भातपेरणीचे संकट
वार्ताहर /मजगाव
मजगाव परिसरात उत्कृष्ट हंगाम मिळाल्यामुळे खरीप हंगामातील भातपेरणी केली होती. परंतु गेल्या चार दिवसापूर्वी मजगाव परिसराला पावसाने झोडपल्याने भात उगवण्याअगोदरच कुजण्याच्या मार्गावर आहे. सतत पाऊस सुरू असल्याने भाताची उगवण व्हायच्या अगोदरच शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी किंवा रोप लागवडीशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जर सलग पाऊस पडत राहिल्यास निम्याहून अधिक शेती पडीक राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या शेतकऱ्यांना पावसाच्या पूर्ण उघडिपीची गरज आहे. किमान आठवडाभर उघडीप असेल तरच भात उगवण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. तसे न झाल्यास मजगाव परिसरातील शेतकरी पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे.
Home महत्वाची बातमी मजगावच्या शेतकऱ्यांवर दुबार भातपेरणीचे संकट
मजगावच्या शेतकऱ्यांवर दुबार भातपेरणीचे संकट
वार्ताहर /मजगाव मजगाव परिसरात उत्कृष्ट हंगाम मिळाल्यामुळे खरीप हंगामातील भातपेरणी केली होती. परंतु गेल्या चार दिवसापूर्वी मजगाव परिसराला पावसाने झोडपल्याने भात उगवण्याअगोदरच कुजण्याच्या मार्गावर आहे. सतत पाऊस सुरू असल्याने भाताची उगवण व्हायच्या अगोदरच शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी किंवा रोप लागवडीशिवाय पर्याय नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जर सलग पाऊस पडत राहिल्यास निम्याहून अधिक […]