विकासाला अडसर ठरणाऱ्या उमेदवाराला धडा शिकवा

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन : बेळगावच्या विकासाला नेहमीच दुय्यम लेखल्याचा आरोप बेळगाव : विकासाच्या योजना हुबळीकडे वळविणाऱ्या भाजप उमेदवाराला मतदारांनी योग्य धडा शिकवावा, असे आवाहन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. आपल्या गृहकार्यालयात त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्या बोलत होत्या. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी यापूर्वीपासून बेळगावच्या विकासाला विरोध केला […]

विकासाला अडसर ठरणाऱ्या उमेदवाराला धडा शिकवा

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन : बेळगावच्या विकासाला नेहमीच दुय्यम लेखल्याचा आरोप
बेळगाव : विकासाच्या योजना हुबळीकडे वळविणाऱ्या भाजप उमेदवाराला मतदारांनी योग्य धडा शिकवावा, असे आवाहन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. आपल्या गृहकार्यालयात त्यांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना उद्देशून त्या बोलत होत्या. भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांनी यापूर्वीपासून बेळगावच्या विकासाला विरोध केला आहे. बेळगावसाठी आलेल्या विकास योजना हुबळीला वळविल्या आहेत. याबाबत बेळगावातील जनतेकडून अनेक वेळा आंदोलने करण्यात आली होती. असे असताना त्या नेत्याकडून बेळगाववासियांकडून मतदानाची अपेक्षा केली जात आहे. यासाठी मतदारांनी अशा उमेदवारांना योग्य धडा शिकवावा, असे त्यांनी सांगितले. केंद्राकडून बेळगावसाठी मंजूर करण्यात आलेली उडान योजना हुबळीला वळवून घेतली आहे. या दरम्यान बेळगावमधील जनतेकडून आंदोलन करण्यात आल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात बेळगावला उडान योजनेचा लाभ करून देण्यात आला आहे. वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सुविधा बेळगावला मंजूर करून देण्यात त्यांनीच अडथळा आणला आहे. उच्च न्यायालयाचे पीठ बेळगावला होणे आवश्यक होते. मात्र, उद्देशपूर्वक हे पीठ रोखून धरण्यात आले आहे. आयटी कंपन्या, विकासाच्या योजना, केवळ हुबळी-धारवाडसाठी मंजूर करून घेतल्या आहोत. आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगावच्या विकासाला नेहमीच दुय्यम लेखले आहे. त्यामुळे मतदारांनी विचार करून मतदान करावे. बेळगाव लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना भरघोस मतदान करून विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.