धबधब्यात दोन तरुणांनी मारली उडी, एकाचा मुत्यू

धबधब्यात दोन तरुणांनी मारली उडी, एकाचा मुत्यू

महाराष्ट्रातील पालघर मध्ये एक दुःखद घटना घडली आहे. पालघर मधील जव्हार परिसरात प्रसिद्ध दाभोसा धबधब्यात बुडाल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही तरुण धबधब्याजवळ अंघोळ करण्यासाठी गेलेत. या दरम्यान दोन तरुणांनी १२० फूट उंचीवर चढले व इथून त्यांनी थेट पाण्यात उडी घेतली. याचा व्हिडीओ त्यांच्या मित्रांनी फोन मध्ये रेकॉर्ड केला. 

 

धबधब्यात उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे माज शेख आणि जोएब आहे. माज शेख ज्याचे वय २४ आहे. उडी मारल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. तर जोएब गंभीररित्या जखमी झाला आहे. तसेच रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांच्या मते, दाभोसा सरोवर फिरण्यासाठी मुंबई मधून मीरा रोडच्या कशिमीरी येथील 3 युवक आले होते तिघे मित्र होते. दोन तरुणांचा धबधब्यात उडी मारतांनाचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Edited By- Dhanashri Naik   

Go to Source