टाटा एसीइ ईव्ही 1000 मिनी ट्रक बाजारात
पूर्ण चार्जवर ट्रक 161 किमी धावणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोर्ट्सने भारतीय बाजारात टाटाचा ई कार्गो मोबिलिटी सेगमेंटमध्ये मिनी ट्रक टाटा एसीइ ईव्ही 1000 सादर केला आहे. दरम्यान कंपनीने दावा केला आहे, की शून्य कार्बन उत्सर्जन मिनी ट्रक एक टन उच्च वजन वाहू शकतात. म्हणजेच पंच एसयूव्ही प्रमाणेच वजन उचलणारा आहे. टाटाचा ईव्ही ट्रक पूर्ण चार्ज केल्यानंतर 161 किमी इतके अंतर कापू शकणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
टाटा कंपनीने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत हा सदरचा नवीन ट्रक विकसित केला असल्याचे सांगितले जात आहे. सदरचा नवीन ट्रक एफएमसीजी, पेय, पेंट आणि वंगण, एलपीजी आणि दुग्धव्यवसाय यासारख्या अनेक क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यास सक्षम असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
Home महत्वाची बातमी टाटा एसीइ ईव्ही 1000 मिनी ट्रक बाजारात
टाटा एसीइ ईव्ही 1000 मिनी ट्रक बाजारात
पूर्ण चार्जवर ट्रक 161 किमी धावणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी टाटा मोर्ट्सने भारतीय बाजारात टाटाचा ई कार्गो मोबिलिटी सेगमेंटमध्ये मिनी ट्रक टाटा एसीइ ईव्ही 1000 सादर केला आहे. दरम्यान कंपनीने दावा केला आहे, की शून्य कार्बन उत्सर्जन मिनी ट्रक एक टन उच्च वजन वाहू शकतात. म्हणजेच पंच एसयूव्ही प्रमाणेच वजन उचलणारा आहे. […]