गुन्हेगारी रोखण्यासाठी कृतिशील पावले उचला

पोलीस ध्वजदिन कार्यक्रमात महानिरीक्षकांची सूचना बेळगाव : सायबर क्राईमसह वाढती गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलिसांनी कृतिशील पावले उचलण्याची सूचना बेळगाव उत्तरचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश यांनी केली. मंगळवारी पोलीस परेड मैदानावर ध्वजदिन कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या संधीचा सदुपयोग करून बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वसामान्य नागरिकांशी संयमाने वागावे, अशी सूचनाही त्यांनी केली. या कार्यक्रमात […]

गुन्हेगारी रोखण्यासाठी कृतिशील पावले उचला

पोलीस ध्वजदिन कार्यक्रमात महानिरीक्षकांची सूचना
बेळगाव : सायबर क्राईमसह वाढती गुन्हेगारी थोपविण्यासाठी पोलिसांनी कृतिशील पावले उचलण्याची सूचना बेळगाव उत्तरचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश यांनी केली. मंगळवारी पोलीस परेड मैदानावर ध्वजदिन कार्यक्रमात ते बोलत होते. समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या संधीचा सदुपयोग करून बदल घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. सर्वसामान्य नागरिकांशी संयमाने वागावे, अशी सूचनाही त्यांनी केली. या कार्यक्रमात पोलीस आयुक्त इडा मार्टीन, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, पी. व्ही. स्नेहा, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, निवृत्त साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मदारसाब वन्नूर, निवृत्त पोलीस निरीक्षक श्रीनिवास हंडा आदी अधिकारी उपस्थित होते. पोलीस ध्वजदिनानिमित्त आकर्षक पथसंचलनही झाले.