न्यायमूर्तींच्या धास्तीने ‘स्मार्ट सिटी’ची नाटके
पणजी : गेले सहा महिने पणजीतील जनतेला स्मार्ट सिटीने विविध बांधकामांद्वारे धूळ चारल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी स्वत: पाहणी करणार असे जाहीर करताच स्मार्ट सिटीवाल्यांनी रविवारी व सोमवारी रस्त्यावरील धूळ, माती हटविली एवढेच नव्हे न्यायाधिशांना पणजीतील रस्ते केवढे स्वच्छ ठेवलेले आहेत हे दाखविण्यासाठी रस्त्यांवऊन पाण्याची फवारणीही केली. मात्र ही नाटके त्वरित बंद करावी, अशी मागणी पणजीतील नागरिकांनी केली आहे. पणजी व आसपासच्या परिसरातील नागरिक धूळ प्रदूषणामुळे अक्षरश: हैराण झालेले आहेत. संपूर्ण पणजी शहरातील रस्ते खोदून ठेवताना स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराने कोणतीही काळजी घेतली नसल्याने नोव्हेंबर 2023 पासून एप्रिल 2024 पर्यंत जनतेला सातत्याने माती व धूळ प्रदूषणाला सामोरे जावे लागले आहे.
पणजीकरांना होतोय त्रास
या त्रासांमुळे अनेक नागरिक अक्षरश: थंडी, ताप आणि प्रदीर्घ खोकल्यामुळे आजारी पडलेले आहेत. धूळ प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या या समस्या आणि आजार यातून मार्ग निघत नाही. दोन-दोन महिने थंडी, खोकल्याला सामोरे जावे लागले. वारंवार जनतेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर देखील स्मार्ट सिटी कंत्राटदाराने काहीही केले नाही.
न्यायालयामुळे आली जाग
या प्रकरणी पणजीतील जागृत नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन पणजी महापालिका, स्मार्ट सिटी व्यवस्थापन व कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षाकडे लक्ष वेधून घेतले. पणजीत एवढे प्रचंड धूळ प्रदूषण झाल्यानंतर देखील प्रदूषण नियंत्रण मंडळ साधी दखल देखील घेत नाही. यामुळे जनतेत तीव्र संताप निर्माण झाला. न्यायालयाने दखल घेऊन न्यायमूर्तीनी आपण स्वत: पणजीतील रस्त्यांची सोमवारी पाहणी करणार असे जाहीर केले.
मातीचे ढिगारे हटविले
न्यायाधीश पाहणी करणार असल्यामुळे रविवारी आणि काल सोमवारी दुपारपर्यंत पणजीतील अनेक रस्त्यांवरील मातीचे ढिगारे कंत्राटदाराने हटविले. त्याचबरोबर रस्त्यावरील धूळही हटविण्याचे काम लगबगीने हाती घेतले. रविवारी व सोमवारी पणजीतील रस्त्यांवर पाण्याचे टँकर फिरवून त्यातून पाण्याची फवारणी रस्त्यांवर करण्यात आली.
रोज हवी पाण्याची फवारणी
आम्ही शहरातील रस्त्यांची व नागरिकांची देखील काळजी घेतलीय आहे, अशी नाटके स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने केली. त्यामुळे पणजीतील नागरिकांनी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांविऊद्ध तीव्र संताप व्यक्त केला. एक दोन दिवस पाण्याची फवारणी समस्या सुटणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पणजीरांनी व्यक्त केली. रस्त्यांवर रोज पाण्याची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपले कुठे?
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ निद्रिस्त अवस्थेत आहे पणजीतील या कारभारातून सिद्ध झाले. पणजी शहर धूळ प्रदूषणाने लालेलाल झालेले असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वत:हून कधी साधी दखल देखील घेतली नाही. गोव्यातील सर्व प्रसारमाध्यमांनी पणजी शहराला आलेल्या बकाल व्यवस्थेची सचित्र माहिती दिल्यानंतर देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची साधी दखल घेतली नाही. कंत्राटदाराची कानउघडणीदेखील केली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा चेअरमन पणजीत राहतो. तो देखील धुळीतून प्रवास कऊन जातो.
उपाययोजना करण्याची गरज
काम करताना आजूबाजूला जाळी लावून धूळ नियंत्रणत आणणे, माती काढल्यानंतर ती इतरत्र पसऊ नये यासाठी कंत्राटदाराने उपाययोजना हाती घेणे आवश्यक होते, परंतु कोणतीही कार्यवाही करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक पावले उचलली नाहीत. त्यामुळे कंत्राटदाराएवढेच दोषी प्रदूषण नियंत्रण मंडळही आहे ही पणजीकरांची धारणा झालेली आहे. केवळ न्यायालयाने दखल घेतल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ खडबडून जागे झालेले आहे, मात्र आता धूळ प्रदूषण नियंत्रण व्यवस्था केवढे दिवस चालणार असा प्रश्न नागरिकांमध्ये पडला आहे.
Home महत्वाची बातमी न्यायमूर्तींच्या धास्तीने ‘स्मार्ट सिटी’ची नाटके
न्यायमूर्तींच्या धास्तीने ‘स्मार्ट सिटी’ची नाटके
पणजी : गेले सहा महिने पणजीतील जनतेला स्मार्ट सिटीने विविध बांधकामांद्वारे धूळ चारल्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी स्वत: पाहणी करणार असे जाहीर करताच स्मार्ट सिटीवाल्यांनी रविवारी व सोमवारी रस्त्यावरील धूळ, माती हटविली एवढेच नव्हे न्यायाधिशांना पणजीतील रस्ते केवढे स्वच्छ ठेवलेले आहेत हे दाखविण्यासाठी रस्त्यांवऊन पाण्याची फवारणीही केली. मात्र ही नाटके त्वरित बंद करावी, अशी मागणी पणजीतील […]