2023-24 आर्थिक वर्षात मिडकॅप-स्मॉलकॅप समभागांची चांदी
वृत्तसंस्था/ मुंबई
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी दमदार कामगिरी नोंदवली आहे. गुंतवणूकदारांना या क्षेत्रातील कंपन्यांनी उत्तम परतावा देत मोठा दिलासा दिला आहे.
आर्थिक वर्ष 2023-24मध्ये बीएसई मिडकॅम निर्देशांक 15013 अंक किंवा 62.38 टक्के इतका दमदार वाढला होता. दुसरीकडे स्मॉलकॅप निर्देशांक सदरच्या आर्थिक वर्षामध्ये 16068 अंक किंवा 59.60 टक्के इतका वाढला होता. छोट्या कंपन्यांनी 62 टक्के इतका दमदार परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. देशातील अर्थ व्यवस्था मजबूत राहिली असून या सोबत विविध कंपन्यांचे तिमाही निकालसुद्धा चांगले लागल्याने गुंतवणूकदारांचा कल वाढलेला पाहायला मिळाला.
सदरच्या आर्थिक वर्षामध्ये 30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स 14659 अंकांनी किंवा 24 टक्के वाढ देऊन थांबला. 31 मार्च रोजी 23881 या नीचांकी पातळीवर बीएसईचा मिडकॅप निर्देशांक कार्यरत होता. याने 8 फेब्रुवारी रोजी 40282 हा सर्वोच्च स्तर प्राप्त केला. तर बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकाने 7 फेब्रुवारीला 46821 अंकांवर पोहोचत सर्वकालीक उच्चांक प्राप्त केला. याच निर्देशांकाने 31 मार्चला 26692 ची नीचांकी गाठली होती. 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 7 मार्च रोजी 72 हजार 245 या सर्वकालीक उच्चांकावर पोहोचला होता.
कोणत्या कंपन्या, निर्देशांक उत्तम
आर्थिक वर्ष 2023-24 ची सांगता झाली असून यामध्ये निफ्टीने 28 टक्के इतका परतावा दिला आहे. अलीकडच्या दहा वर्षांमध्ये पाहता निफ्टी निर्देशांकाची यंदाची कामगिरी ही दुसरी सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकाने दमदार कामगिरी केली आहे. निफ्टी 500 मधील प्रत्येक पाच समभागांमागे एक समभाग एकाच वर्षांमध्ये गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट करण्यामध्ये यशस्वी ठरला आहे. टाटा मोटर्स आणि बजाज ऑटो यांनी तर दमदार 135 टक्क्यांचा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे पण दुसरीकडे हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एचडीएफसी बँक यांच्या समभागांमध्ये मात्र घसरण दिसून आली.
निफ्टीतले दमदार परतावा
देणारे समभाग
टाटा मोटर्स 135 टक्के
बजाज ऑटो 135 टक्के
अदानी पोर्टस् 112 टक्के
हिरो मोटोकॉर्प 101 टक्के
कोणत्या निर्देशांकाने
अधिक परतावा दिला
रिअल्टी 129 टक्के
पॉवर 85 टक्के
कॅपिटल गुड्स 77 टक्के
ऑटो 74 टक्के
हेल्थकेअर 60 टक्के
Home महत्वाची बातमी 2023-24 आर्थिक वर्षात मिडकॅप-स्मॉलकॅप समभागांची चांदी
2023-24 आर्थिक वर्षात मिडकॅप-स्मॉलकॅप समभागांची चांदी
वृत्तसंस्था/ मुंबई आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांनी दमदार कामगिरी नोंदवली आहे. गुंतवणूकदारांना या क्षेत्रातील कंपन्यांनी उत्तम परतावा देत मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक वर्ष 2023-24मध्ये बीएसई मिडकॅम निर्देशांक 15013 अंक किंवा 62.38 टक्के इतका दमदार वाढला होता. दुसरीकडे स्मॉलकॅप निर्देशांक सदरच्या आर्थिक वर्षामध्ये 16068 अंक किंवा 59.60 टक्के इतका वाढला होता. छोट्या […]