काँग्रेसमुळेच अरविंद केजरीवाल हे तुरुंगात : माकप

काँग्रेसमुळेच अरविंद केजरीवाल हे तुरुंगात : माकप

वृत्तसंस्था/ कोझिकोड
दिल्लीतील विरोधी पक्षांच्या एकत्रित सभेच्या दुसऱ्याच दिवशी इंडिया आघाडीत पुन्हा मतभेद तीव्र झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरूनच या आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. माकपचे नेते आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरच टीका केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसमुळेच नुकसान सहन करावे लागत आहे. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या तक्रारीमुळेच केजरीवाल आता तुरुंगात आहेत असा आरोप विजयन यांनी केला आहे.
काँग्रेस आणि माकप हे इंडिया आघाडीत सामील आहेत, परंतु राहुल गांधी काय करत आहेत हे काहीच माहित नाही. राहुल हे वायनाड लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक लढवत आहेत, परंतु ते भाकप उमेदवाराच्या विरोधातच लढत आहेत. मग राहुल गांधी हे देशपातळीवर भाजपला टक्कर कशी देणार असे प्रश्नार्थक विधान विजयन यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना काढले आहेत.