हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात लैंगिक शोषण प्रतिबंधक कार्यशाळा

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात लैंगिक शोषण प्रतिबंधक कार्यशाळा

बेळगाव : कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासंबंधीच्या कायद्याविषयी जागृतीसाठी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. महिला व बालकल्याण खाते, हिंडलगा मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेत प्रमुख पाहुण्या म्हणून शिशु विकास योजनाधिकारी सुमित्रा डी. बी. व व्याख्यात्या म्हणून महिला कल्याण संस्थेच्या सुरेखा पाटील उपस्थित होत्या. कारागृह अधीक्षक विजय रोडकर यांच्या अध्यक्षतेखाली 13 रोजी हा कार्यक्रम झाला. महिला व मुलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे असून सरकारी व बिगर सरकारी कार्यालयात महिला सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती असणे सक्तीचे आहे, असे सुमित्रा यांनी सांगितले. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठी 2013 मध्ये पीओएसएच अॅक्ट-2013  अंमलात आला आहे. या कायद्याचा उद्देश कार्यशाळेत सांगण्यात आला. यावेळी कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक क्ही. कृष्णमूर्ती, मल्लिकार्जुन कोण्णूर, प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी आदी उपस्थित होते.