..तर ‘ईडी’ ‘पीएमएलए’ अंतर्गत अटक करू शकत नाही : सुप्रीम काेर्ट

..तर ‘ईडी’ ‘पीएमएलए’ अंतर्गत अटक करू शकत नाही : सुप्रीम काेर्ट


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : विशेष न्यायालयामार्फत तक्रारीची दखल घेतल्यानंतर सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) तरतुदींनुसार आरोपीला अटक करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्‍पष्‍ट केले आहे.

Supreme Court says that ED can’t arrest the accused under provisions of PMLA after the special court has taken cognisance of the complaint.
Supreme Court also says if ED requires custody then the probe agency can move the application before the concerned court and thereafter the… pic.twitter.com/2vFSbdCpDc
— ANI (@ANI) May 16, 2024

न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने म्‍हटलं आहे की, विशेष न्यायालयाने तक्रारीची दखल घेतल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यातील (पीएमएलए) कलम 19 अंतर्गत आरोपीला अटक करण्याची परवानगी नाही. या निर्देशामुळे आता आरोपींना ताब्यात घेण्यासाठी ईडीला न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Go to Source