सॅमसंगचा गॅलेक्सी एम-35 17 जुलैला होणार लाँच

सॅमसंगचा गॅलेक्सी एम-35 17 जुलैला होणार लाँच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सॅमसंग ही मोबाइल विश्वातील दिग्गज कंपनी आपले नवनवे फोन सादर करण्यात व्यस्त असून यातीलच आपला नवा स्मार्टफोन एम 35 5जी याच महिन्यात भारतात लाँच करणार असल्याचे समजते. 6 हजार एमएएचची दमदार बॅटरी असणारा हा फोन भारतात 17 जुलैला लाँच होणार आहे.
हा सुपर अमोलेड डिस्प्लेसह येणार असून कॉर्निंग गोरीला ग्लास विक्टस प्लसचे सुरक्षा कवच याला असणार आहे. या 5जी फोनमध्ये 5एनएम आर्किटेक्चरचा इक्सीनॉस 1380 प्रोसेसर असून गेमिंगमध्ये रस असणाऱ्यांना हा फोन नक्कीच आवडेल, असे कंपनीने म्हटले आहे. कुलिंग चेंबरची रचना फोनमध्ये असल्याने फोन लवकर गरम होत नाही. 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून संपूर्ण दिवस फोन यावर वापरता येतो. शिवाय 25 डब्ल्यूची फास्ट चार्जिंगची सुविधाही यात असेल. 50 मेगापिक्सलचा मुख्य सेंसर असेल.
महत्त्वाच्या नोंदी
रंग : हलका निळा, गडद निळा आणि ग्रे
बॅटरी : 6000 एमएएच
किमत : 19 हजार रुपयांच्या घरात
स्क्रीन : 6.6 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले
कॅमेरा : 50 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल, 2 मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा.