युक्रेनवरील हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ कीव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मॉस्को दौऱ्यादरम्यान रशियाने युव्रेनच्या अनेक भागात हल्ले केले आहेत. त्यात लहान मुलांच्या ऊग्णालयाचाही समावेश आहे. रशियन हल्ल्यात किमान 31 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. कीवमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये रुग्णालयात मृत्यू झालेल्या दोन मुलांचा समावेश आहे. याशिवाय निप्रोपेत्रोव्स्कमध्ये 11 […]

युक्रेनवरील हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ कीव
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मॉस्को दौऱ्यादरम्यान रशियाने युव्रेनच्या अनेक भागात हल्ले केले आहेत. त्यात लहान मुलांच्या ऊग्णालयाचाही समावेश आहे. रशियन हल्ल्यात किमान 31 लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. कीवमध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये रुग्णालयात मृत्यू झालेल्या दोन मुलांचा समावेश आहे. याशिवाय निप्रोपेत्रोव्स्कमध्ये 11 तर पूर्व युव्रेनमधील पोक्रोव्स्कमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या घटनेचा निषेध केला आहे. रशियाने कीव आणि स्लोव्हियान्स्कसह अनेक शहरांवर सुमारे 40 क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. यामध्ये रहिवासी इमारती आणि मुलांच्या रुग्णालयाचे नुकसान झाले आहे.