स्वत:च्या राज्यपालांना आवरा : महुआ मोइत्रा

स्वत:च्या राज्यपालांना आवरा : महुआ मोइत्रा

पोलीस आयुक्त अन् उपायुक्तांवरील कारवाईचे प्रकरण
वृत्तसंस्था/ कोलकाता
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी केंद्रीय गृह मंत्रालयावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांच्या कार्यालयाची निंदा केल्याप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांच्या विरोधात गृह मंत्रालयाने केलेली शिस्तभंगाची कारवाई हास्यास्पद असल्याचे मोइत्रा यांनी म्हटले आहे.
गृह मंत्रालयाने राजभवनाची प्रतिमा मलीन केल्याप्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे. राजभवनाच्या परिसरात महिलांची छेड काढून राज्यपालांनीच स्वत:च्या कार्यालयाची प्रतिमा मलीन केल्याची टीका मोइत्रा यांनी केली आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाने स्वत:च्या राज्यपालांना आवर घालावा, कारण ते स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाहीत असे वक्तव्य मोइत्रा यांनी केले आहे. तर लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांनी देखील पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील कारवाईवर प्रश्न उपस्थित केला आहे.