टाटाची उत्सवी हंगामात ग्राहकांना मिळणार नवी भेट

टाटाची उत्सवी हंगामात ग्राहकांना मिळणार नवी भेट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतातील दिग्गज ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी टाटा मोटर्स येणाऱ्या उत्सवी काळात ग्राहकांना नवी गाडी भेट देण्यासाठी उत्सुक आहे. आगामी उत्सवी हंगामात कंपनी आपली नवी कर्व्ह इव्ही कुप ही एसयुव्ही गटात कार लाँच करणार असल्याची माहिती आहे. यासंबंधीची माहिती कंपनीने टीझरवर दिली आहे.
स्लीक डिझाइन हे या गाडीचे वैशिष्ट्या असणार असून अनेकविध आधुनिक वैशिष्ट्योही यात असतील. या गाडीत एलइडी टेललाइटस्, फ्लश फिटींग डोअर हँडल्स असतील. ही गाडी अॅक्टी इव्ही प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
इतर सुविधा…
अॅनिमेटेड लाइटस् यासारख्या सुविधा यात आहेत. कर्व्ह इव्ही ही कंपनीची पहिली इंटरनल कंबश्चन इंजिनची गाडी असून 10.25 इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, जेबीएल साऊंड सिस्टम, पॅनारॉमिक सनरुफ, 12.3 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह नवी कार येणार आहे.