आईवर गोळी झाडली; हातोड्याने घेतला पत्नीचा जीव अन् ३ मुलांना…
सीतापूर ; (उत्तर प्रदेश) : Bharat Live News Media ऑनलाईन उत्तर प्रदेशात एकाच कुटुंबातील ६ लोकांच्या मृत्यूने सीतापूर गाव हादरून गेले. या विषयी मिळालेल्या माहितीनुसार युवकाने आई, पत्नी आणि मुलांची निर्घुण हत्या केली. पहिला संबंधित युवकाने आपल्या आईची हत्या केली. पत्नीचाही हातोडा मारून जीव घेतला. ही घटना मथुरा परिसरातील पल्हापूर गावांत घडली.
यानंतर संशयीत आरोपीने तीन्ही मुलांना छतावरून खाली फेकले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील पाच लोकांच्या हत्येनंतर संशयीताने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले. सुरूवातीच्या मिळालेल्या माहितीनुसार संशयीत आरोपी हा व्यसणी होता आणि मानसिक रूग्ण होता. तो नेहमी चिंतेत राहायचा.
पाल्हापूर येथील वीरेंद्र सिंहचा मुलगा अनुराग सिंहने रात्री हा हत्याकांड केला. मानसिकरित्या विक्षिप्त अनुराग सिंहने आई सावित्री देवी (वय ६२), पत्नी प्रियंका सिंह (४०) मुलगी आष्वी (१२), मुलगा अनुराग आणि मुलगी आरना (०८) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आदविक (०४) याचा उपचारादरम्यान ट्रामा सेंटर मध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर अनुराग सिंह यानेही स्वत:चे जीवन संपवले. सकाळी या घटनेची माहिती झाल्यावर गावात खळबळ उडाली.
या घटनेवर सीतापूरचे पोलिस अधिकारी चक्रेश मिश्रा यांनी म्हटले की, आज मथुरामध्ये रामपूर पोलिसांना माहिती मिळाली की, मानसिकरीत्या आजारी असलेल्या व्यक्तीने आपल्या कुटुंबातील ५ लोकांची हत्या करून स्वत:ला गोळी मारून जीवन संपवले. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे.
हेही वाचा :
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या ते मारेकऱ्यांना जन्मठेप; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : प्रत्यक्ष खटला सुरू होण्यापूर्वी विस्मयकारक घडामोडी
Dr. Narendra Dabholkar case : सूत्रधारांना पकडण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार