ओसाकाची विजयी सलामी

ओसाकाची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ लिबेमा
जपानच्या नाओमी ओसाकाने विम्बल्डनपूर्व लिबेमा ओपन ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत विजयी सुरुवात करताना चौथ्या मानांकित एलिस मर्टेन्सचा पराभव केला.
ओसाकाने या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखताना बेल्जियमच्या मर्टेन्सविरुद्ध पहिल्या सेटमध्ये दोन ब्रेक्स मिळविले. पण आपली सर्व्हिस तिने राखता हा सेट 6-2 असा घेतला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र दोघांत चांगली झुंज रंगली. दहाव्या गेमपर्यंत दोघीनी आपली सर्व्हिस राखली होती. नेटजवळ मिळालेला सुदैवी गुण व अप्रतिम मैदानी फटके मारत मिळविलेल्या दोन संधींचा लाभ घेत ओसाकाने हा सेट 6-4 असा घेत सामना संपवला. माजी अग्रमानांकित असलेली ओसाका सध्या जागतिक क्रमवारीत 125 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया व यूएस ओपनमधील हार्डकोर्टवर यश मिळविलेल्या ओसाकाला विम्बल्डन ग्रास कोर्टवर मात्र अपेक्षित यश मिळविता आलेले नाही. येथे तिची पुढील लढत अमेरिकेची बर्नार्डा पेरा किंवा हॉलंडची सुझान लॅमेन्स यापैकी एकीशी होईल.