…आता बांधली लग्नगाठ

प्रेमीयुगुलाने उचलले नाट्यामय पाऊल बेळगाव : प्रियकराला जाब विचारण्यासाठी आलेल्या प्रेयसीला मारहाण करण्यात आली होती. यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर या प्रेमीयुगुलाने वाद विसरून नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचे सामोरे आले आहे. दि. 25 मार्च रोजी ही घटना घडली होती. गणेश गौडर (वय 21), नागराज होसकेरी […]

…आता बांधली लग्नगाठ

प्रेमीयुगुलाने उचलले नाट्यामय पाऊल
बेळगाव : प्रियकराला जाब विचारण्यासाठी आलेल्या प्रेयसीला मारहाण करण्यात आली होती. यासंबंधी माळमारुती पोलीस स्थानकात तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर या प्रेमीयुगुलाने वाद विसरून नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचे सामोरे आले आहे. दि. 25 मार्च रोजी ही घटना घडली होती. गणेश गौडर (वय 21), नागराज होसकेरी (वय 21), विनोद चव्हाण (वय 21) या तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला होता. मूळची रामदुर्ग तालुक्यातील व सध्या बैलहोंगल येथे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली होती. प्रियकराला जाब विचारण्यासाठी आली असता त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे त्या तरुणीने तक्रारीत म्हटले होते. एफआयआर दाखल होऊन केवळ दोन दिवसांत या युगुलाने 27 मार्च रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केले असून शुक्रवारी हे दोघे पोलीस स्थानकात हजर झाले आहेत. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.