राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत नीरजला गोल्ड
मायदेशातील स्पर्धेत तीन वर्षांनी पुनरागमन करत केली सुवर्णमय कामगिरी, तजिंदरपाल, अॅल्ड्रिन, पॉलराज यांनाही सुवर्ण
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने 82.27 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. डीपी मनूने 82.06 मीटर भालाफेक करत रौप्यपदक जिंकले तर उत्तम पाटीलला कांस्यपदक मिळाले. दरम्यान, अव्वल खेळाडू किशोर जेनाची कामगिरी मात्र या स्पर्धेत खराब राहिली. याशिवाय गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर व लांब उडीपटू जेस्विन अॅल्ड्रिन यांनी आपल्या मानांकनाला साजेशी कामगिरी करताना सुवर्णपदके पटकावली.
कोरोनानंतर प्रथमच राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत सहभागी होत असलेल्या नीरजने सुवर्ण जिंकण्याची कामगिरी केली. नीरजने पहिल्या प्रयत्नात 82 मीटर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात फाऊल झाला तर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 81.29 मीटर भाला फेक केली. चौथ्या प्रयत्नात मात्र त्याने सर्वोत्तम कामगिरी करताना 82.27 मीटर भालाफेक करत आघाडी घेतली. दरम्यान, रौप्यपदक विजेता डीपी मनूने पहिल्या प्रयत्नात 82.06 मीटर तर दुसऱ्या प्रयत्नात 77.23 मीटर भाला फेकला पण पुढे सातत्य न राखता आल्याने त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. उत्तम पाटीलने 78.39 मीटर भालाफेक करत कांस्यपदक जिंकले.
दरम्यान, राष्ट्रीय स्पर्धेतील या सुवर्णमय कामगिरीनंतर नीरज आनंदी नसल्याचे दिसून आले. याआधी डायमंड लीगमध्ये नीरजने 86 मीटर भाला फेक केली होती तर राष्ट्रीय स्पर्धेतही त्याने दमदार कामगिरी केली आहे. आता, पुढील आठवड्यापासून मोरोक्को येथे होणाऱ्या डायमंड लीग स्पर्धेत तो सहभागी होईल.
तजिंदर, अॅल्ड्रिन यांनाही सुवर्ण
मात्र तजिंदरपाल व अॅड्रिन या दोन्ही अॅथलेट्सना वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी पार करता आली नाही, तसेच ऑलिम्पिक पात्रतेची मर्यादाही गाठता आली नाही. आशियाई विक्रमधारक पंजाबच्या तूरने तिसऱ्या प्रयत्नात केलेल्या थ्रो मुळे अव्वल स्थान मिळविले. त्याने 20.38 मी. गोळाफेक केली. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 21.77 मी.ची असून 21.50 ही ऑलिम्पिक पात्रतेची मर्यादा आहे. मध्यप्रदेशचा समरदीप सिंग (18.93 मी.) व उत्तर प्रदेशचा आर्यन त्यागी (18.07 मी.) यांनी रौप्य व कांस्य मिळविले.
पुरुषांच्या लांब उडीमध्ये राष्ट्रीय विक्रमधारक अॅल्ड्रिनने 7.99 मी. उडी घेत सुवर्ण मिळविले. केरळच्या मुहम्मद अनीस याह्या व मध्यप्रदेशच्या आदित्य कुमार सिंग यांनी अनुक्रमे 7.83 व 7.81 मी. उडी घेत रौप्य व कांस्य मिळविले.
त्याआधी महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय विक्रमधारक रोझी मीना पॉलराजने 4.05 मी. अंतर नोंदवले. मात्र तिची ही कामगिरी 4.21 मी. या राष्ट्रीय विक्रमापेक्षा कमी ठरली. तिची तामिळनाडूची सहकारी बारानिका इलांगोवन 4 मी. अंतर नोंदवत रौप्य व केरळच्या मारिया जेसनने 3.90 मी. अंतर नोंदवत कांस्य घेतले.
Home महत्वाची बातमी राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत नीरजला गोल्ड
राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत नीरजला गोल्ड
मायदेशातील स्पर्धेत तीन वर्षांनी पुनरागमन करत केली सुवर्णमय कामगिरी, तजिंदरपाल, अॅल्ड्रिन, पॉलराज यांनाही सुवर्ण वृत्तसंस्था/ भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेत भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने 82.27 मीटर भाला फेकत सुवर्णपदकाला गवसणी घातली. डीपी मनूने 82.06 मीटर भालाफेक करत रौप्यपदक जिंकले तर उत्तम पाटीलला कांस्यपदक मिळाले. दरम्यान, अव्वल खेळाडू किशोर जेनाची कामगिरी मात्र या […]