रामचरित मानस, पंचतंत्रचा रिजनल रजिस्टरमध्ये समावेश

रामचरित मानस, पंचतंत्रचा रिजनल रजिस्टरमध्ये समावेश

युनेस्कोकडून भारताच्या समृद्ध वारशाचा गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायजेशनने (युनेस्को) रामचरित मानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकनला जागतिक मान्यता दिली आहे. या साहित्यिक रचनांना मेमोरी ऑफ द वर्ल्ड एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टरमध्ये (एमओडब्ल्यूसीएपी) सामील करण्यात आले आहे.
द मेमोरी ऑफ द वर्ल्ड इंटरनॅशनल अॅडव्हायजरी आणि एक्झिक्यूटिव्ह बोर्डाकडून शिफारस करण्यात आलेल्या दस्तऐवजांना जागतिक महत्त्व आणि यूनिव्हर्सल व्हॅल्यूच्या आधारावर या यादीत सामील करण्यात आले आहे. रिजनल रजिस्टरमध्य सामील दस्तऐवजांना जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यास मदत मिळते. तसेच एका देशाची संस्कृती जगातील अनेक देशांपर्यंत पोहोचते.
38 देशांकडून मान्यता
रामचरित मानस, पंचतंत्रचे नामांकन दिल्लीतील इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सकडून रिजनल रजिस्टरसाठी करण्यात आले होते. उलनाबटार येथे  एमओडब्ल्यूसीएपीच्या बैठकीत या दस्तएwवजांना सादर करणाऱ्या इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्सच्या कला विभागाचे प्रमुख प्राध्यापक रमेश चंद्र गौड यांनी युनेस्कोचे 38 सदस्य आणि 40 निरीक्षक देशांनी या साहित्यिक कलाकृतींचे जागतिक महत्त्व ओळखून त्यांना मान्यता दिली असल्याची माहिती दिली. ही कामगिरी भारतीय संस्कृतीचा प्रसार आणि संरक्षणासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
रामचरित मानस, पंचतंत्र आणि सहृदयलोक-लोकन यासारख्या साहित्यकृतींनी भारतीय संस्कृती आणि साहित्याला अत्यंत प्रभावित केले आहे. या साहित्यिक कलाकृतींनी केवळ भारतच नव्हे तर अन्य देशातील लोकांवरही मोठा प्रभाव पाडला असल्याचे संस्कृती मंत्रालयाकडून म्हटले गेले आहे.
युनेस्कोकडून या भारतीय साहित्य कलाकृतींना मान्यता मिळणे ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारशासाठी गौरवाची बाब आहे. तसेच हा सन्मान भारतीय संस्कृतीच्या रक्षणासाठी नवी पावले टाकण्यास मदत करणार आहे. रामचरितमानस हा भगवान रामाच्या चरित्रावर आधारित धार्मिक ग्रंथ असून तो गोस्वामी तुलसीदास यांनी अवधी भाषेत लिहिला आहे. पंचतंत्र मूळ स्वरुपात संस्कृत भाषेत असून त्यात दंत तसेच लोककथा सामील आहेत, विष्णू शर्मा यांनी त्याचे लेखन केले आहे. तर सहृदयलोक-लोकन हे आचार्य आनंदवर्धन यांनी संस्कृत भाषेत