टोयोटा किर्लोस्कर मोटरचा ‘टीग्लॉस’ उपक्रम

मुंबई : टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड (टीकेएम) ने  आपला रिव्होल्यूशनरी कार केअर ब्रँड, ‘टीग्लॉस’ लॉन्च करण्याची घोषणा केली, ज्याने कार डिटेलिंगच्या जगात ब्रँडचा प्रवेश केला आहे. टीग्लॉसची रचना त्यांच्या कारला सौंदर्याच्या दृष्टीने उत्कृष्ट स्थितीत ठेवण्यास मदत करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले आहे. भारतातील ग्राहकांमधील उच्च दर्जाच्या आणि विश्वासार्ह कार डिटेलिंग सेवांच्या वेगाने […]

टोयोटा किर्लोस्कर मोटरचा ‘टीग्लॉस’ उपक्रम

मुंबई :
टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड (टीकेएम) ने  आपला रिव्होल्यूशनरी कार केअर ब्रँड, ‘टीग्लॉस’ लॉन्च करण्याची घोषणा केली, ज्याने कार डिटेलिंगच्या जगात ब्रँडचा प्रवेश केला आहे.
टीग्लॉसची रचना त्यांच्या कारला सौंदर्याच्या दृष्टीने उत्कृष्ट स्थितीत ठेवण्यास मदत करून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केले आहे. भारतातील ग्राहकांमधील उच्च दर्जाच्या आणि विश्वासार्ह कार डिटेलिंग सेवांच्या वेगाने वाढणाऱ्या मागणीला प्रतिसाद देत, टीकेएम टोयोटा वाहनांसाठी विशेषत: तयार केलेल्या सर्वसमावेशक सोल्यूशन्ससह कार केअर इंडस्ट्रीला पुन्हा परिभाषित करण्यासाठी सज्ज असल्याचे कंपनीचे उपाध्यक्ष सबरी मनोहर यांनी स्पष्ट केले. टीग्लॉस कार केअर सेवा भारतातील प्रत्येक अधिकृत टोयोटा डीलरशिपवर ग्राहकांना आनंददायी अनुभव देईल. ज्याद्वारे  व्यावसायिक पद्धतीने दर्जेदार कार केअर सोल्यूशन्स लाभ देईल. याचा उद्देश केवळ वाहनांचे सौंदर्यात्मक आकर्षण वाढवणे नाही तर पर्यावरणीय घटकांपासून काही प्रमाणात संरक्षण करणे देखील आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.