कबीर बहियाला डेट करतेय क्रीति
लंडनमधून व्हायरल झाले छायाचित्र
क्रीति सेनॉन आता क्रू या चित्रपटात दिसून आली आहे. यात तिने तब्बू आणि करिना कपूरसोबत काम केले आहे. याचदरम्यान क्रीति स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चेत आहे. लंडनमधून अभिनेत्रीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती एका युवकासोबत दिसून येत आहे. हे छायाचित्र समोर येताच ती डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू आहे.
अभिनेत्री क्रीति आता कबीर बहियाला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. कबीर हा अनेक बॉलिवूड सोहळ्यांमध्ये दिसून येतो. तो युकेच्या एका आघाडीच्या उद्योजकाचा पुत्र आहे. क्रीतिने अद्याप स्वत:च्या या कथित रिलेशनशिपविषयी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी क्रीति ही प्रभास या दक्षिणेच्या सुपरस्टारला डेट करत असल्याचे वृत्त होते.
क्रीति ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. क्रीति ही यापूर्वी सुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. क्रीति आगामी काळात अनेक बिगबजेट चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे. क्रीतिची देशभरात मोठी फॅन फॉलोइंग असल्याने तिच्याविषयी जाणून घेण्यास मोठी उत्सुकता असते.
Home महत्वाची बातमी कबीर बहियाला डेट करतेय क्रीति
कबीर बहियाला डेट करतेय क्रीति
लंडनमधून व्हायरल झाले छायाचित्र क्रीति सेनॉन आता क्रू या चित्रपटात दिसून आली आहे. यात तिने तब्बू आणि करिना कपूरसोबत काम केले आहे. याचदरम्यान क्रीति स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यावरून चर्चेत आहे. लंडनमधून अभिनेत्रीचे एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती एका युवकासोबत दिसून येत आहे. हे छायाचित्र समोर येताच ती डेटिंग करत असल्याची चर्चा सुरू […]