लुमिनस पॉवर टेक्नॉलॉजीचा सौर पॅनेल निर्मितीचा कारखाना सुरु

लुमिनस पॉवर टेक्नॉलॉजीचा सौर पॅनेल निर्मितीचा कारखाना सुरु

नवी दिल्ली :
लुमिनस पॉवर टेक्नॉलॉजी यांनी आता सौर ऊर्जा उत्पादनामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे. रुद्रपुर, उत्तराखंड येथे आपल्या नव्या कारखान्याचा शुभारंभ नुकताच कंपनीने केला आहे. सोलार पॅनेल निर्मितीचे कामही केले जाणार आहे. या कारखान्यातून 250 मेगावॅट इतक्या सौर ऊर्जेचे उत्पादन घेतले जाणार आहे. या अंतर्गत पुढील काळामध्ये सौर ऊर्जा उत्पादन एक गिगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट कंपनीने समोर ठेवले आहे.
दहा एकर क्षेत्रफळाच्या विस्तीर्ण परिसरामध्ये कंपनीचा कारखाना कार्यरत असून पुढील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सौर ऊर्जा उत्पादनामध्ये दुप्पट वाढ करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याआधी कंपनी इन्व्हर्टर आणि बॅटरी या क्षेत्रामध्ये कार्यरत होती.
काय म्हणाल्या सीईओ
सौर ऊर्जेची मागणी वाढती लक्षात घेऊन शून्य कार्बनच्या दिशेने भारताची वाटचाल होत असून यामध्ये सहभाग घेताना कंपनीला अत्यंत आनंद होत असल्याची प्रतिक्रिया लुमिनस पावर टेक्नॉलॉजीच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक प्रीती बजाज यांनी म्हटले आहे. रुद्रपुर येथे कंपनी सोलार पॅनल निर्मितीचे कार्य हाती घेत आहे. यायोगे रहिवासी स्तरावरील आणि व्यावसायिक स्तरावरील रूफटॉप सोलर पॅनलच्या वाढत्या मागणीची दखल घेतली जाणार आहे.