भारताचा सामना आज अमेरिका ‘मिनी इंडिया’शी

भारताचा सामना आज अमेरिका ‘मिनी इंडिया’शी

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज बुधवारी होणाऱ्या गट स्तरावरील साखळी सामन्यात भारताचा सामना प्रभावी पण अनुभवी अमेरिकेशी होणार आहे. यावेळी भारतीय संघातील प्रमुख फलंदाज ‘ड्रॉप-इन’ खेळपट्ट्dयांमुळे आलेल्या बंधनांतून स्वत:ला मुक्त करून मोकळेपणाने आपले फटके खेळू पाहतील.
भारताला सुपर एटमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे आणि नासाऊ काउंटी खेळपट्टीचे स्वरूप जरी वेगाच्या बाबतीत बदलणारे असले, तरी त्यांना पाकिस्तानविऊद्धच्या सामन्याची पुनरावृत्ती आवडणार नाही. त्यात त्यांनी 28 धावांत त्यांचे शेवटचे सात फलंदाज गमावले. असे असले, तरी अमेरिकेविरुद्ध आज संघाचा दृष्टिकोन जास्त जोखीम घेण्याचा असू शकतो.
भारतातर्फे खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेले काही भारतीय अमेरिकन खेळाडू आज आपली जन्मभूमी असलेल्या देशाविऊद्ध मैदानात उतरणार असून त्यात मोनांक पटेल, सौरभ नेत्रावळकर, जेसी सिंग आणि हरमित सिंगसारख्यांवर जास्त लक्ष असेल. जरी येथील खेळपट्टीने संघांमधील फरक लक्षणीयरीत्या कमी केलेला असला, तरी भारत व अमेरिका संघांच्या दर्जातील दरी खूप जास्त आहे. पाकिस्तानवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळविल्यानंतरही अमेरिकी संघाला अमेरिकन चॅनल्सवर किंवा प्रसिद्ध वृत्तपत्रात फारशी प्रसिद्धी मिळालेली नाही. परंतु बुधवारी त्यांच्या आवडीचा देश त्यांच्या कामगिरीची दखल घेण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विराट कोहली, रोहित शर्मा यांना गोलंदाजी करण्याची किंवा बुमराहला सामोरे जाण्याची संधी रोज मिळत नाही.
दुसरीकडे, भारताचा हा ’बिग अॅपल एक्स्टेंशन’मधील शेवटचा सामना असेल आणि त्यात संधी मिळाल्यास प्रथम फलंदाजी करण्याचा पर्याय ते निवडू शकतात. कारण जर भारताने प्रथम गोलंदाजी केली, तर अमेरिका बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांच्यासमोर तीन आकडी धावसंख्या गाठण्याची शक्यता कमीच आहे. नेत्रावळकरला यावेळी त्याचा मुंबईचा माजी सहकारी सूर्यकुमार यादवला गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकते, तर हरमित आणि केंजिगे या दोन डावखुऱ्या फिरकीपटूंसमोर रिषभ पंतला मोकळीक न देण्याचे आव्हान असेल. अली खानचा वेग आणि चेंडू उसळविण्याकडील कल पाहता रोहितला त्याच्याविरुद्ध पुल फटका वारंवार वापरण्यास तो नक्कीच प्रवृत्त करेल. फटकेबाज नितीश कुमार हा भारतासाठी अडचण उभा करू शकतो. भारताचा सर्वांत कमकुवत दुवा शिवम दुबे राहिला आहे.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अमेरिका : मोनांक पटेल (कर्णधार), एरॉन जोन्स, अँड्रिज गॉस, कोरे अँडरसन, अली खान, हरमित सिंग, जेसी सिंग, मिलिंद कुमार, निसर्ग पटेल, नितीश कुमार, नोष्टुश केंजिगे, सौरभ नेत्रावळकर, शॅडली व्हॅन शाल्कविक, स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)
 
ऑस्ट्रेलियाची लढत आज नामिबियाशी

 
वृत्तसंस्था/ नॉर्थ साउंड (अँटिग्वा)
सलग दोन विजयांमुळे आत्मविश्वासाने भरलेल्या ऑस्ट्रेलियाचे आज बुधवारी येथे नामिबियाचा सामना करताना सुपर एटमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य असेल. ऑस्ट्रेलिया मागील साखळी सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडवर 36 धावांनी एकतर्फी विजय मिळविताना या स्पर्धेत 200 हून अधिक धावा करणारा पहिला संघ बनला होता. अंतिम साखळी लढतीत स्कॉटलंडचा सामना करण्यापूर्वी नामिबियाला पराभूत करणे त्यांना पुरेसे आहे. स्कॉटलंड सध्या पाच गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे. दुसरीकडे, नामिबियाचा भर हा ओमानविऊद्धच्या सुपर ओव्हरमधील विजयात चमकलेला अनुभवी अष्टपैलू खेळाडू डेव्हिड वायसे, डावखुरा फिरकीपटू बर्नार्ड शॉल्ट्झ यांच्यावर राहील.
सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)
 
नेपाळविरु द्ध श्रीलंकेला विजय आवश्यक

दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या पराभवानंतर माजी विजेत्या श्रीलंकेच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे आणि आता लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणाऱ्या गट ‘ड’मधील सामन्यात नेपाळविऊद्ध त्यांची स्थिती करो किंवा मरो अशी राहणार आहे. दुसरीकडे नेपाळच्या आतापर्यंतच्या एकमेव सामन्यात नेदरलँड्सने त्यांचा सहा गडी राखून पराभव केलेला आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशविऊद्धच्या विजयानंतर सुपर एटमध्ये प्रवेश केला आहे. वानिंदू हसरंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेला आज विजय मिळाल्यास बांगलादेश, नेदरलँड्सबरोबरची त्यांची दुसऱ्या स्थानासाठीची शर्यत आणखी तीव्र होईल. आज विजय मिळविण्याच्या दृष्टीने जास्त जबाबदारी त्यांच्या फलंदाजांवर असेल.
 सामन्याची वेळ : पहाटे 5 वा. (भारतीय वेळेनुसार)