भारत-पाक ‘हाय-प्रोफाइल’ मुकाबला आज

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान त्यांच्या आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आज रविवारी होणाऱ्या सामन्यात जेव्हा भिडतील तेव्हा आत्मविश्वासपूर्ण आणि सुस्थितीत असलेला भारत पाकिस्तानच्या असुरक्षित अवस्थेचा आणि येथील कठीण परिस्थितीशी परिचित नसल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. हा सामना या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वांत मोठी गर्दी खेचण्याची अपेक्षा आहे. शहराच्या बाहेरील आयझेनहॉवर पार्क […]

भारत-पाक ‘हाय-प्रोफाइल’ मुकाबला आज

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान त्यांच्या आतुरतेने वाट पाहिल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील आज रविवारी होणाऱ्या सामन्यात जेव्हा भिडतील तेव्हा आत्मविश्वासपूर्ण आणि सुस्थितीत असलेला भारत पाकिस्तानच्या असुरक्षित अवस्थेचा आणि येथील कठीण परिस्थितीशी परिचित नसल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. हा सामना या स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वांत मोठी गर्दी खेचण्याची अपेक्षा आहे. शहराच्या बाहेरील आयझेनहॉवर पार्क येथे नव्याने बांधलेल्या 34 हजार आसनी नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तो होणार आहे.

या हाय-प्रोफाइल लढतीत खेळपट्टी हा एक प्रमुख चर्चेचा मुद्दा राहणार आहे, येथील खेळपट्टीवर भरपूर टीका झालेली असून स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांतील सहा डावांमध्ये संघांना केवळ दोनदाच 100 धावांचा टप्पा ओलांडता आलेला आहे. असमान उसळीमुळे येथे फलंदाजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे, स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या अमेरिकेकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघ गुऊवारी रात्री न्यूयॉर्कला पोहोचला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी विश्रांती घेतली. परिणामी बाबर आझम व त्याच्या खेळाडूंना नासाऊ स्टेडियमवरील आव्हानात्मक परिस्थितीशी जुळवून घेण्यास मर्यादित वेळ मिळाला आहे, जे आजच्या महत्त्वपूर्ण लढतीत गैरसोयीचे ठरू शकते.
आयर्लंडविऊद्ध भारतीय थिंक टँकने डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवला वगळून अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची निवड केली होती. आजही रणनीती तशीच राहण्याची अपेक्षा आहे. कारण सामना न वापरलेल्या मध्य खेळपट्टीवर खेळला जाण्याची अपेक्षा आहे. तथापि, कुलदीपचा अलीकडचा फॉर्म आणि पाकिस्तानी फलंदाज, विशेषत: बाबरविऊद्धची त्याची कामगिरी पाहता संघ व्यवस्थापन त्याचा समावेश करण्याचा विचार करू शकते. तसे झाल्यास अक्षर पटेल किंवा रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते. फलंदाजीची क्रमकवारी मात्र स्थिरावल्यात जमा असून रोहित आणि विराट कोहली सलामीवीराच्या भूमिकेत, तर रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, बाबरने अमेरिकेविरुद्धच्या धक्क्याचा दोष प्रामुख्याने गोलंदाजांवर ठेवला असला, तरी त्याच्यासह संघाच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीकडे दुर्लक्ष करणे त्याला परवडणारे नाही. कर्णधाराने त्याच्या 44 धावांसाठी 43 चेंडू घेतले. ‘टी-20’मध्ये ही कामगिरी समाधानकारक स्ट्राइक रेटच्या जवळपासही पोहोचत नाही. त्याच्याकडून आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त परिस्थिती असताना संघाची गाडी रुळावर आणण्ण्यासाठी शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील वेगवान माऱ्यावर पाकिस्तानने आज भर दिला, तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. दरम्यान, या महत्त्वपूर्ण लढतीसाठी स्थानिक अधिकारिणींनी कडक सुरक्षा उपाय घेतले आहेत.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा. (भारतीय वेळेनुसार)