चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांसाठी मोफत रंगभूषेची सेवा

चित्ररथातील कलाकारांच्या अडचणी दूर करण्यासाठी म. ए. समिती-सकल मराठा समाजाचा उपक्रम बेळगाव : सकल मराठा समाज बेळगाव व शहर म. ए. समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहर परिसरात चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा केली जाणार आहे. बेळगावमध्ये भव्यदिव्य प्रमाणात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावेळी मंडळांना सहकार्य व्हावे, यासाठी मिरवणुकीतील पात्रांना म. ए. समिती व […]

चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांसाठी मोफत रंगभूषेची सेवा

चित्ररथातील कलाकारांच्या अडचणी दूर करण्यासाठी म. ए. समिती-सकल मराठा समाजाचा उपक्रम
बेळगाव : सकल मराठा समाज बेळगाव व शहर म. ए. समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव शहर परिसरात चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा केली जाणार आहे. बेळगावमध्ये भव्यदिव्य प्रमाणात शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावेळी मंडळांना सहकार्य व्हावे, यासाठी मिरवणुकीतील पात्रांना म. ए. समिती व सकल मराठा समाजाच्यावतीने मोफत रंगभूषा करण्यात येणार आहे. बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षी शनिवार दि. 11 रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. चित्ररथ मिरवणुकीत शिवरायांच्या चरित्रातील प्रसंग सादर केले जातात. चित्ररथातील कलाकारांना रंगभूषा करताना अनेक अडचणी येत असतात. त्या दूर करण्यासाठी मोफत रंगभूषा केली जात आहे. शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून खासबाग डबल रोड येथील लक्ष्मण निवास तळमजला येथे रंगभूषा केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी 9964777565 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन सकल मराठा समाज व म. ए. समितीकडून करण्यात आले आहे.