अरविंद केजरीवाल हनुमान दर्शनाने करणार प्रचाराला सुरूवात

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आपच्या निवडणूक प्रचाराची रणनीती बदलली आहे. (Arvind Kejriwal) केजरीवालांच्या सुटकेमुळे आप पक्षाच्या निवडणूक प्रचाराला धार येणार आहे. त्यासाठी ते आज सकाळी 11 वाजता हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेणार असून तेथूनच त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान दुपारी १ वाजता केजरीवाल पत्रकार परिषद घेणार …

अरविंद केजरीवाल हनुमान दर्शनाने करणार प्रचाराला सुरूवात

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर आपच्या निवडणूक प्रचाराची रणनीती बदलली आहे. (Arvind Kejriwal) केजरीवालांच्या सुटकेमुळे आप पक्षाच्या निवडणूक प्रचाराला धार येणार आहे. त्यासाठी ते आज सकाळी 11 वाजता हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेणार असून तेथूनच त्यांच्या निवडणूक प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान दुपारी १ वाजता केजरीवाल पत्रकार परिषद घेणार असून, सायंकाळी दिल्लीमध्ये मेगा रोड शोमध्ये सहभागी होणार असल्याचे समजत आहे.
दिल्लीत पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक मतदान २५ मे रोजी पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर 1 एप्रिलपासून तिहारमध्ये बंद असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची 10 मे रोजी सायंकाळी 7 वाजता सुटका करण्यात आली. तप्पूर्वी त्यांच्या (Arvind Kejriwal) पत्नी सुनीता केजरीवाल दुपारी मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्या होत्या. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांच्या अंतरिम जामीनाबाबत आदेश दिला.
जामिनाची बातमी लोकांपर्यंत पोहोचताच तुरुंगाबाहेर लोकांची गर्दी होऊ लागली. सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री कारागृहाच्या आवारातून बाहेर येऊन तीन क्रमांकाच्या गेटजवळ पोहोचले तेव्हा त्यांचे हजारो समर्थक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ‘जेलचे कुलूप तोडले, केजरीवाल मुक्त झाले’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. फटाक्यांची आतषबाजी करत, आप कार्यकर्त्यांनी केजरीवालांचे स्वागत केले. यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी देशाला हुकूमशाहीपासून वाचवायचे आहे अशी पहिली प्रतिक्रिया दिली.

हनुमान जी के आशीर्वाद से, करोड़ों करोड़ों लोगों की दुआओं से और सुप्रीम कोर्ट के judges के न्याय की वजह से आप सब लोगों के बीच लौट कर मुझे बेहद ख़ुशी हो रही है।
आज मिलते हैं –
11 am – हनुमान मंदिर, कनॉट प्लेस
1 pm – प्रेस कांफ्रेंस, पार्टी ऑफिस
4 pm – रोड शो – दक्षिण दिल्ली -…
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) May 11, 2024

हेही वाचा:

Arvind Kejriwal : ‘हुकूमशाही संपेल, जनताच न्याय करेल’, तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
Arvind Kejriwal : केजरीवाल करणार लोकसभा निवडणूक प्रचार, त्यांच्या वकिलांनी दिली माहिती
Arvind Kejriwal | मोठी बातमी : अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा! १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Go to Source