अपात्र ‘धारावी’करांच्या पुनर्वसाचा मार्ग मोकळा

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी शहरातील मिठागरांची 256 एकर जागा दिली जाणार आहे. ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा (Rehabilitation) प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामुळे धारावी प्रकल्पाचे कामही प्रगतिपथावर जाणार आहे.धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने (DRPPL) राज्य सरकारकडे अंदाजे 550 एकर जागा मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारने मुंबईतील (mumbai) मुलुंड, कांजूरमार्ग, वडाळा आणि अन्य ठिकाणच्या मिठागरांची (salt pain) एकूण 283 एकर जागा मिळावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देत 256 एकर जागा राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लवकरच ही जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित होणार असून त्यातील 228 एकर जागा ‘डीआरपीपीएल’ला सोपविण्यात येईल. जागा ताब्यात आल्यानंतर त्यावर अपात्र रहिवाशांसाठी घरे बांधण्याच्या कामास सुरुवात केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे पुनर्वसित इमारतींसह मिठागराच्या जागेवरील बांधकामास एकत्रित सुरुवात करण्याचा निर्णय ‘डीआरपीपीएल’ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.केंद्राकडून मिळणाऱ्या 256 एकर जागेपैकी वडाळा येथील 28 एकर जागा दुसऱ्या एका सरकारी यंत्रणेला उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी डीआरपीपीएलला अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील 228 एकर जागा उपलब्ध असेल. या जागेवर शक्य तितक्या अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. उर्वरित अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी अन्यत्र जागा मिळविण्याचा डीआरपीपीएलचा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष पुनर्विकासाला येत्या सहा ते आठ महिन्यांत सुरुवात करण्याचे नियोजन डीआरपीपीएलचे आहे. रेल्वेच्या मोकळ्या जागेवरील पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आरंभ केला जाणार आहे. काँग्रेसचा विरोध धारावी पुनर्विकासाठी मिठागरांची जागा देण्यास काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी  विरोध दर्शविला आहे. मिठागरांच्या जमिनींवर इमारती उभ्या राहिल्यास मुंबईला पुराचा धोका निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ‘‘मोदींच्या मित्राला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका या महाभ्रष्ट सरकारची आहे,’’ असा घणाघात वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर केला.हेही वाचा 12 वर्षांच्या मुलावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार वांद्रे : माउंट मेरी जत्रेसाठी ‘या’ तारखेपासून वाहतूक निर्बंध लागू

अपात्र ‘धारावी’करांच्या पुनर्वसाचा मार्ग मोकळा

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी शहरातील मिठागरांची 256 एकर जागा दिली जाणार आहे. ही जागा राज्य सरकारला हस्तांतरित करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनाचा (Rehabilitation) प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामुळे धारावी प्रकल्पाचे कामही प्रगतिपथावर जाणार आहे.
धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने (DRPPL) राज्य सरकारकडे अंदाजे 550 एकर जागा मागितली होती. त्यानुसार राज्य सरकारने मुंबईतील (mumbai) मुलुंड, कांजूरमार्ग, वडाळा आणि अन्य ठिकाणच्या मिठागरांची (salt pain) एकूण 283 एकर जागा मिळावी, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता देत 256 एकर जागा राज्य सरकारला देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता लवकरच ही जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित होणार असून त्यातील 228 एकर जागा ‘डीआरपीपीएल’ला सोपविण्यात येईल. जागा ताब्यात आल्यानंतर त्यावर अपात्र रहिवाशांसाठी घरे बांधण्याच्या कामास सुरुवात केली जाईल. महत्त्वाचे म्हणजे पुनर्वसित इमारतींसह मिठागराच्या जागेवरील बांधकामास एकत्रित सुरुवात करण्याचा निर्णय ‘डीआरपीपीएल’ने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
केंद्राकडून मिळणाऱ्या 256 एकर जागेपैकी वडाळा येथील 28 एकर जागा दुसऱ्या एका सरकारी यंत्रणेला उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या तरी डीआरपीपीएलला अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी मुलुंड आणि कांजूरमार्ग येथील 228 एकर जागा उपलब्ध असेल. या जागेवर शक्य तितक्या अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. उर्वरित अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी अन्यत्र जागा मिळविण्याचा डीआरपीपीएलचा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष पुनर्विकासाला येत्या सहा ते आठ महिन्यांत सुरुवात करण्याचे नियोजन डीआरपीपीएलचे आहे. रेल्वेच्या मोकळ्या जागेवरील पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाने धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आरंभ केला जाणार आहे.काँग्रेसचा विरोधधारावी पुनर्विकासाठी मिठागरांची जागा देण्यास काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी  विरोध दर्शविला आहे. मिठागरांच्या जमिनींवर इमारती उभ्या राहिल्यास मुंबईला पुराचा धोका निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. ‘‘मोदींच्या मित्राला संपूर्ण मुंबई गिळायची आहे आणि त्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची, लागेल ते करण्याची भूमिका या महाभ्रष्ट सरकारची आहे,’’ असा घणाघात वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर केला.हेही वाचा12 वर्षांच्या मुलावर तरुणाकडून लैंगिक अत्याचारवांद्रे : माउंट मेरी जत्रेसाठी ‘या’ तारखेपासून वाहतूक निर्बंध लागू

Go to Source