कळवा रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसूती
ठाणे (thane) महापालिकेच्या (thane municiple corporation) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबाहेर मंगळवारी सकाळी एका महिलेची प्रसूती (delivery) झाल्याचा प्रकार घडला. या घटनेत एका नवजात बालकाचा (new born child) मृत्यू झाला. पोटात दुखू लागल्याने ही गर्भवती महिला रुग्णालयात पहाटे चारच्या दरम्यान आली होती.मात्र तिला रुग्णालयात दाखल करून न घेता घरी पाठवण्यात आले. घरी गेल्यावर पुन्हा पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात आल्यानंतर तेथील आवारात गाडीमध्ये महिलेची प्रसूती झाली. यावेळी एका बालकाचा रुग्णालयाबाहेरच प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. तर दुसऱ्या बालकाची प्रसूती रुग्णालयात करण्यात आली. ते नवजात अर्भक सुखरूप असून रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या एका बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.कळवा (kalwa) पूर्व येथील ओतकोनेश्वर नगर भागात राहणाऱ्या महिलेचे प्रसूतीसाठी कळवा रुग्णालयात नाव नोंदवले होते. याच रुग्णालयात तिच्या नियमित तपासण्या सुरू होत्या. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने ती रुग्णालयात आली. मात्र तिला रुग्णालयात (hospital) दाखल करून न घेता पुन्हा घरी पाठवण्यात आले. प्रसूतीची वेळ अद्याप आली नसल्याचे सांगत तिला घरी पाठवण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र घरी गेल्यावर या महिलेला पोटात पुन्हा दुखू लागल्याने सकाळी तिला खासगी वाहनाने नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालयात आणले.वाटेत वाहतूककोंडी असल्याने रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेरच तिची प्रसूती झाली. गाडीतच तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात नेण्यात आले. याठिकाणी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मात्र गाडीत प्रसूती झालेल्या अर्भकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसरे बालक व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.हेही वाचाMSRTC च्या संपामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची तारांबळ12 वर्षांच्या मुलावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार
Home महत्वाची बातमी कळवा रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसूती
कळवा रुग्णालयाबाहेरच महिलेची प्रसूती
ठाणे (thane) महापालिकेच्या (thane municiple corporation) कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबाहेर मंगळवारी सकाळी एका महिलेची प्रसूती (delivery) झाल्याचा प्रकार घडला. या घटनेत एका नवजात बालकाचा (new born child) मृत्यू झाला. पोटात दुखू लागल्याने ही गर्भवती महिला रुग्णालयात पहाटे चारच्या दरम्यान आली होती.
मात्र तिला रुग्णालयात दाखल करून न घेता घरी पाठवण्यात आले. घरी गेल्यावर पुन्हा पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात आल्यानंतर तेथील आवारात गाडीमध्ये महिलेची प्रसूती झाली. यावेळी एका बालकाचा रुग्णालयाबाहेरच प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला.
तर दुसऱ्या बालकाची प्रसूती रुग्णालयात करण्यात आली. ते नवजात अर्भक सुखरूप असून रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आमच्या एका बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कळवा (kalwa) पूर्व येथील ओतकोनेश्वर नगर भागात राहणाऱ्या महिलेचे प्रसूतीसाठी कळवा रुग्णालयात नाव नोंदवले होते. याच रुग्णालयात तिच्या नियमित तपासण्या सुरू होत्या. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास पोटात दुखू लागल्याने ती रुग्णालयात आली.
मात्र तिला रुग्णालयात (hospital) दाखल करून न घेता पुन्हा घरी पाठवण्यात आले. प्रसूतीची वेळ अद्याप आली नसल्याचे सांगत तिला घरी पाठवण्यात आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र घरी गेल्यावर या महिलेला पोटात पुन्हा दुखू लागल्याने सकाळी तिला खासगी वाहनाने नातेवाईकांनी पुन्हा रुग्णालयात आणले.
वाटेत वाहतूककोंडी असल्याने रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाला. त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेरच तिची प्रसूती झाली. गाडीतच तिने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर या महिलेला तातडीने रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात नेण्यात आले. याठिकाणी तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मात्र गाडीत प्रसूती झालेल्या अर्भकाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर दुसरे बालक व्यवस्थित असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.हेही वाचा
MSRTC च्या संपामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची तारांबळ
12 वर्षांच्या मुलावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार