जितेंद्र आव्हाड यांची उच्च न्यायालयात धाव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar) यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपाप्रकरणी विविध ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांची पूर्तता करण्यासाठी शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे (ncp) नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही आव्हाड यांच्या याचिकेची दखल घेतली. न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली असून या याचिकेवर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. आव्हाड यांच्यावर रायगड आणि पुणे जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी याचिका केली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सरकारसह राज्याच्या पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली. राज्यातील प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा मसुदा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावरून राज्य सरकारवर विविध स्तरातून टीका झाल्यानंतर सरकारने मनुस्मृतीच्या (manusmruti) मसुद्याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करत जितेंद्र आव्हाड यांनी 29 मे 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तलावाजवळ आंदोलन केले. त्यावेळी राज्य सरकारचा निषेध करत वादग्रस्त लिखाण फाडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडला गेली होता. मात्र, हे छायाचित्र चुकून फाडण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी याचिकेत केला आहे. या घटनेनंतर त्यांच्यावर रायगड जिल्ह्यात दोन आणि पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्यांना एकत्रित करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी याचिकेत केली आहे.हेही वाचा 12 वर्षांच्या मुलावर तरुणाकडून लैंगिक अत्याचार CSMT-Kudal अनारक्षित गणपती विशेष गाडी धावणार

जितेंद्र आव्हाड यांची उच्च न्यायालयात धाव

डॉ.बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar) यांचे छायाचित्र फाडल्याच्या आरोपाप्रकरणी विविध ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यांची पूर्तता करण्यासाठी शरद पवार यांचे राष्ट्रवादीचे (ncp) नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही आव्हाड यांच्या याचिकेची दखल घेतली. न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली असून या याचिकेवर त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.आव्हाड यांच्यावर रायगड आणि पुणे जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. त्याच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी याचिका केली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सरकारसह राज्याच्या पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली.राज्यातील प्राथमिक शाळांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा मसुदा समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयावरून राज्य सरकारवर विविध स्तरातून टीका झाल्यानंतर सरकारने मनुस्मृतीच्या (manusmruti) मसुद्याचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करत जितेंद्र आव्हाड यांनी 29 मे 2024 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तलावाजवळ आंदोलन केले. त्यावेळी राज्य सरकारचा निषेध करत वादग्रस्त लिखाण फाडताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडला गेली होता. मात्र, हे छायाचित्र चुकून फाडण्यात आल्याचा दावा आव्हाड यांनी याचिकेत केला आहे. या घटनेनंतर त्यांच्यावर रायगड जिल्ह्यात दोन आणि पुण्यातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात एक असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्यांना एकत्रित करण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी याचिकेत केली आहे.हेही वाचा12 वर्षांच्या मुलावर तरुणाकडून लैंगिक अत्याचारCSMT-Kudal अनारक्षित गणपती विशेष गाडी धावणार

Go to Source