संख्याबळानुसार मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतला जाईल, शरद पवारांचे वक्तव्य
वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा कोणाचा असेल यावर अद्याप महाविकास आघाडीकडून काहीही वक्तव्य आलेले नाही मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्रीच्या पदासाठी चेहऱ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापुरात बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी चेहऱ्याबाबत कोणत्यापक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे पाहावे लागेल त्यांनतर संख्याबळानुसार निर्णय घेण्यात येईल.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय संख्याबळावर होईल, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. 1977 मध्येबानी नंतर निवडणुका झाल्या आणि सर्वांनी एकत्र येऊन मुरारजींचे नाव पुढे केले. स्थिर सरकार देण्याचा आमचा उद्देश असल्याचेही शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्रिपदासाठीच्या चेहऱ्याबाबत सध्या विचार करण्याचे कारण नाही, संख्याबळानंतर याचा विचार केला जाईल. संख्याबळ असताना कोणाचे नेतृत्व करायचे याचा निर्णय निवडणुकीनंतर घ्यावा लागतो, असे अनेकवेळा घडले आहे. अजून काही ठरलेले नाही. बहुमत नाही, बहुमत असेल यात शंका नाही, पण आत्ताच निर्णय घेण्याची गरज नाही, असेही शरद पवार म्हणाले
Edited by – Priya Dixit