जितो व्हॉलीबॉल स्पर्धेत बेळगाव उपविजेता

बेंगलोर संघाने पटकावले विजेतेपद: दर्शन उत्कृष्ट स्मॅशर बेळगाव : हुबळी येथे जैन समाज मर्यादित जितो इंडिया चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात बेंगलोर संघाने बेळगाव संघाचा 2-0 अशा सेटमध्ये पराभव करून जितो चषक पटकाविला. बेळगावच्या दर्शनला उत्कृष्ट स्मॅशरचा बहुमान देण्यात आला. हुबळी येथे जैन समाज मर्यादित राज्यस्तरीय जीतो चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. […]

जितो व्हॉलीबॉल स्पर्धेत बेळगाव उपविजेता

बेंगलोर संघाने पटकावले विजेतेपद: दर्शन उत्कृष्ट स्मॅशर
बेळगाव : हुबळी येथे जैन समाज मर्यादित जितो इंडिया चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात बेंगलोर संघाने बेळगाव संघाचा 2-0 अशा सेटमध्ये पराभव करून जितो चषक पटकाविला. बेळगावच्या दर्शनला उत्कृष्ट स्मॅशरचा बहुमान देण्यात आला. हुबळी येथे जैन समाज मर्यादित राज्यस्तरीय जीतो चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राज्यातील जवळपास 12 जिह्याने भाग घेतला होता.  या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना बेंगलोर संघाने व बेंगलोर बी संघात झाला. या सामन्यात बेंगलोर अ संघाने बेंगलोर बी चा 25-22, 21-25, 15-12 अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव संघाने हुबळी संघाचा 25-21, 20-25, 15-10 असा सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत मात्र बेंगलोर संघाने बेळगाव संघाचा 25-20, 25-19 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून अजिंक्यपद फटकाविले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेंगलोर संघाला रोख 50 हजार ऊपये व आकर्षक चषक तर उपविजेत्या बेळगाव संघाला 25 हजार ऊपये रोख आकर्षक चषक देण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट स्मॅशर म्हणून बेळगावच्या दर्शनला, तर अष्टपैलू खेळाडू म्हणून बेंगलोरच्या सुरेंद्रला चषक देऊन गौरविण्यात आले.