पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो, ‘हे’ मार्ग बंद

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटकोपरमध्ये येणार आहेत.  बुधवारी नाशिक आणि कल्याणमध्ये पंतप्रधानांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, सायंकाळी घाटकोपरमध्ये रोड शोसुद्धा पार पडणार आहे. 15 मे 2024 रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात होणाऱ्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. रोड शोसाठी घाटकोपरला येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आधी दिंडोरी आणि नंतर कल्याण येथे सभेला संबोधित करणार आहेत.  पंतप्रधान मुंबईत येत असल्या कारणानं शहरातील वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं.  वाहतुक शाखेच्या निर्णयानुसार शहरातील पुढील रस्त्यांवर दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील.  कुठे वाहतूक बंद?वाहतूक बंद असणाऱ्या रस्त्यांमध्ये एलबीएस रोडवर गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शनचा समावेश आहे.    माहुल – घाटकोपर रोडवर मेघराज जंक्शन ते आरबी कदम मार्गापर्यंत वाहतूक बंद राहील. तर, अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर घाटकोपर जंक्शन पासून ते साकीनाका जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल.  हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स पासून ते गुलाटी पेट्रोल पंपापर्यंत आणि गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्टेशन वेस्ट पासून ते सर्वोदय जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल.   In view of the Road Show organised at LBS Road on 15th May 2024, large number of individuals are expected to participate in it. Therefore in order to ease the traffic on the adjoining roads, the following traffic arrangements will be in place.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/B6QECxQnBa — Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 14, 2024 ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग  1. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे 2. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे 3. अंधेरी-कुर्ला रोड 4. साकी विहार रोड 5. MIDC सेंट्रल रोड 6. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) 7. सायन- वांद्रे लिंक रोड 8. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR)वाहतूक बंद असेल त्या वेळेत ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हाइवे, अंधेरी-कुर्ला रोड, साकी विहार रोड, एमआयडीसी सेंट्रल रोड, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड (एससीएलआर), सायन बांद्रा लिंक रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.   हेही वाचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखलबीएमसीच्या मान्सूनपूर्व मोहिमेत 1,644 डेंग्यू हॉटस्पॉट्स आढळले
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो, ‘हे’ मार्ग बंद


लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घाटकोपरमध्ये येणार आहेत.  बुधवारी नाशिक आणि कल्याणमध्ये पंतप्रधानांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर, सायंकाळी घाटकोपरमध्ये रोड शोसुद्धा पार पडणार आहे.15 मे 2024 रोजी मुंबईतील घाटकोपर परिसरात होणाऱ्या रोड शोच्या पार्श्वभूमीवर त्यात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. रोड शोसाठी घाटकोपरला येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आधी दिंडोरी आणि नंतर कल्याण येथे सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मुंबईत येत असल्या कारणानं शहरातील वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं. वाहतुक शाखेच्या निर्णयानुसार शहरातील पुढील रस्त्यांवर दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील. कुठे वाहतूक बंद?वाहतूक बंद असणाऱ्या रस्त्यांमध्ये एलबीएस रोडवर गांधीनगर जंक्शन ते नौपाडा जंक्शनचा समावेश आहे.   माहुल – घाटकोपर रोडवर मेघराज जंक्शन ते आरबी कदम मार्गापर्यंत वाहतूक बंद राहील. तर, अंधेरी घाटकोपर लिंक रोडवर घाटकोपर जंक्शन पासून ते साकीनाका जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल. हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स पासून ते गुलाटी पेट्रोल पंपापर्यंत आणि गोळीबार मैदान आणि घाटकोपर मेट्रो स्टेशन वेस्ट पासून ते सर्वोदय जंक्शन पर्यंत वाहतूक बंद असेल.   In view of the Road Show organised at LBS Road on 15th May 2024, large number of individuals are expected to participate in it. Therefore in order to ease the traffic on the adjoining roads, the following traffic arrangements will be in place.#MTPTrafficUpdates pic.twitter.com/B6QECxQnBa— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) May 14, 2024 ‘हे’ आहेत पर्यायी मार्ग 1. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे2. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे3. अंधेरी-कुर्ला रोड4. साकी विहार रोड5. MIDC सेंट्रल रोड6. सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR)7. सायन- वांद्रे लिंक रोड8. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR)वाहतूक बंद असेल त्या वेळेत ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हाइवे, अंधेरी-कुर्ला रोड, साकी विहार रोड, एमआयडीसी सेंट्रल रोड, सांताक्रूज चेंबूर लिंक रोड (एससीएलआर), सायन बांद्रा लिंक रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.   हेही वाचाघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल
बीएमसीच्या मान्सूनपूर्व मोहिमेत 1,644 डेंग्यू हॉटस्पॉट्स आढळले

Go to Source