बळ्ळारी नाला जलपर्णीच्या विळख्यात : शेतकऱ्यांना धोका
गाळ काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांतून संताप
वार्ताहर /सांबरा
बळ्ळारी नाला जलपर्णीच्या विळख्यात सापडला असून, यावर्षीही नाल्यातील जलपर्णी व गाळ काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बळ्ळारी नाल्याला पूर येण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . पावसाळ्याला सुऊवात झाली की दरवर्षी बळ्ळारी नाला चर्चेत येतो. नाल्यातील जलपर्णी व गाळ काढणे गरजेचे होते अशी चर्चा केली जाते. मात्र पावसाळा संपला की पुन्हा नाल्याकडे दुर्लक्ष केले जाते. अशीच परिस्थिती यावर्षीही झाली आहे. उन्हाळा संपून पावसाळा तोंडावर आला तरी अजून नाल्यातील जलपर्णी व गाळ काढण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे यावर्षीही नाल्याला पूर येण्याचा धोका कायम आहे. सध्या नाल्याचे पात्र दिवसेंदिवस अऊंद होत चालले असून, नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून, जलपर्णी पसरलेली आहे. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यामध्ये नाल्याला पूर येऊन परिसरातील हजारो एकर भातशेती पाण्याखाली जाते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागते. त्यामुळे नाल्यातील गाळ व जलपर्णी काढणे अत्यंत गरजेचे आहे. ज्यावेळी नाल्याला पूर येतो, त्यावेळी नाल्यातील पाण्याबरोबर प्लास्टिक, इंजेक्शन, ब्लेड आदी धोकादायक पदार्थ शेतात वाहून येतात व शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना लागून इजा होते. यासाठी वेळीच नाल्यातील गाळ काढणे गरजेचे बनले आहे.
नाल्यावरच अतिक्रमण
या नाल्याचा संपर्क तालुक्यातील 22 ते 24 गावांना येतो. अलीकडच्या काही वर्षांमध्ये काही शेतकऱ्यांनी नाल्याच्या पात्रावर अतिक्रमण केले असून, सदर नाला दिवसेंदिवस अऊंद होत चालला आहे. या कारणामुळेही नाल्याला दरवर्षी पूर येत आहे. यासाठी प्रशासनाने याकडेही लक्ष देणे गरजेचे बनले आहे.
Home महत्वाची बातमी बळ्ळारी नाला जलपर्णीच्या विळख्यात : शेतकऱ्यांना धोका
बळ्ळारी नाला जलपर्णीच्या विळख्यात : शेतकऱ्यांना धोका
गाळ काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांतून संताप वार्ताहर /सांबरा बळ्ळारी नाला जलपर्णीच्या विळख्यात सापडला असून, यावर्षीही नाल्यातील जलपर्णी व गाळ काढण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बळ्ळारी नाल्याला पूर येण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे . पावसाळ्याला सुऊवात झाली की दरवर्षी बळ्ळारी नाला चर्चेत येतो. […]