कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा आज ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या; मात्र शनिवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार कोल्हापुरात सरासरी 12.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून रविवारी (दि. 23) जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ होऊन ती 14.2 फुटांवर गेली आहे. शहरात …

कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा आज ऑरेंज अलर्ट

कोल्हापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत होत्या; मात्र शनिवारी पावसाने काहीशी उसंत घेतली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार कोल्हापुरात सरासरी 12.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून रविवारी (दि. 23) जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत वाढ होऊन ती 14.2 फुटांवर गेली आहे.
शहरात शनिवारी पावसाने उसंत घेतली होती. दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस होईल असे वाटत होते; मात्र पावसाने हुलकावणी दिली. सायंकाळपर्यंत अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. कमाल तापमान 30.2 अंशांवर, तर किमान तापमान 23.1 अंशांवर गेले होते.
जिल्हा आपत्ती विभागाच्या अहवालानुसार गेल्या 24 तासांत शिरोळ तालुक्यात सर्वाधिक 33 मि.मी. पाऊस झाला. त्यानंतर भुदरगड 3.4, आजरा 2.4, चंदगड 1.6, शाहूवाडी 0.6, कागल 0.4, गडहिंग्लज 0.3, राधानगरी 0.2, करवीर 0.1, हातकणंगलेत 0.1 मि. मी. पाऊस झाला.