पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैशाचे वाटप

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: नाशिक शिक्षक मतदार संघाच्या महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.२२) जळगावात आले होते. येथील आदित्य लॉन येथे मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली. आधीच सभेला उशीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यावर शिक्षक लोकांनी बाहेर जेवणाकडे जाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री गेल्यानंतर या सभागृहात पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी …

पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैशाचे वाटप

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा: नाशिक शिक्षक मतदार संघाच्या महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.२२) जळगावात आले होते. येथील आदित्य लॉन येथे मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली. आधीच सभेला उशीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यावर शिक्षक लोकांनी बाहेर जेवणाकडे जाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री गेल्यानंतर या सभागृहात पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आले, असा आरोप करत याबाबतचा व्हिडिओ शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक २६ जूनला होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. ही सभा सायंकाळी सहा वाजता आदित्य लॉन येथे आयोजित करण्यात आली होती, मात्र तब्बल मुख्यमंत्री हे दोन तास उशिरा आले असल्याने या ठिकाणी शिक्षकांचा हिरमोड झाला. नऊ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केले. जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते. सभेला उशीर झाल्याने काही कर्मचारी या ठिकाणाहून बाहेर पडले, मात्र सभा आटोपल्यानंतर परत सभेच्या ठिकाणी आले. या ठिकाणी त्यांना पैसे वाटण्यात करण्यात आले ,असा आरोप करत  सुषमा आंधारे यांनी ट्विटरद्वारे एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच कुठे आहे निवडणूक आयोग असा सवालही त्यांनी यावेळी ट्विटरद्वारे उपस्थित केला.
हेही वाचा

शरद पवार आणि उद्धव ठाकरे आरक्षणावरुन केवळ आपली राजकीय पोळी भाजत आहेत : आमदार प्रविण दरेकर

नाशिक : देवळा तालुक्यात शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे रंगत अन् जेवणावळीच्या पंगत
छगन भुजबळांनी मराठा, ओबीसी, धनगरांमध्ये वाद पेटवला: मनोज जरांगे

महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री @mieknathshinde यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले.
कुठाय निवडणूक आयोग? @MahavikasAghad3 @ECISVEEP pic.twitter.com/QHT3j0jJIK
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) June 22, 2024