पैठण एमआयडीसी येथील चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

पैठण एमआयडीसी येथील चोरीला गेलेला मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

पैठण Bharat Live News Media वृत्तसेवा: पैठण एमआयडीसीमध्ये एक चोरीची घटना समोर आली आहे. एमआयडीसीमध्ये हॉटेल महाराष्ट्र दरबार समोरील रोड 11 किलोव्हॅट महावितरणचे केबल ड्रम चोरी केल्याची तक्रार केली होती. या वरुन संशयित आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. या नंतर आरोपीकडून पैठण एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला असून. या मुद्देमालाची किंमत तब्बल नऊ लाख रुपये आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी की, पैठण एमआयडीसी परिसरातील रोडवर महावितरण कंपनीसाठी भूमिगत 11 के.व्हीचा महावितरणचे  केबल टाकण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी असलेले केबल संशयित आरोपी रवींद्र पांडुरंग जाधव( रा. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन, छत्रपती संभाजीनगर) यांनी रविवार दि. 16 रोजी चोरी केल्याची तक्रार प्रोजेक्ट मॅनेजर शाहरुख कय्युम पठाण (रा. भारतनगर बिडकीन ता. पैठण) यांनी गुरुवारी (दि.20) एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून उपविभागीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ईश्वर जगदाळे यांनी आरोपीला तात्काळ अटक केले.
संशयित आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, चोरी केलेली केबल वायर मुद्देमाल जालना येथील जाफराबाद या ठिकाणी एका खाजगी वाहनातून नेऊन विक्री करण्यासाठी ठेवले आहे असे सांगितले होते. त्यानंतर एमआयडीसी पोलीस पथकाने जाफराबाद येथून नऊ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. चोरी केलेला केबल वायर जाफराबाद येथे घेऊन जाण्यासाठी वापर केलेल्या वाहनाचा तपास एमआयडीसी पोलिसांनी सुरू केला आहे.
हेही वाचा :

अनुपम खेर यांच्या ऑफिस चोरी प्रकरणी २ सराईट चोरट्यांना अटक
मोबाईल चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण अत्यंत अल्प
चोरी करायला आला आणि एसीत डाराडूर झोपला!