कोल्हापूर : हुपरीत मद्यधुंद कारचालकाने दुचाकी उडविल्या; जमावाकडून चोप

कोल्हापूर : हुपरीत मद्यधुंद कारचालकाने दुचाकी उडविल्या; जमावाकडून चोप

हुपरी Bharat Live News Media वृत्तसेवा : हुपरीतील गावभाग हिराचित्र मंदिर समोर एका मद्यधुंद अवस्थेतील तरुणाने टोयाटा कॅमरी (क्रं.MH 01 AE 1894) या कारने  पाच मोटरसायकलीना धडक देत नुकसान केले. त्यानंतर संतप्त जमावाने त्याला चोप देऊन गाडीच्या काचा फोडल्या रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून घ्यायचे काम सुरू होते .
विशाल भारती हा मद्यधुंद अवस्थेतील तरूण कार चालवित होता. त्याच्या भारधाव कारने बुलेट, ज्युपिटर, स्पेलडंर अशा पाच गाड्यांना धडक दिली. त्यामुळे संतप्त तरूणांनी एकत्र येत त्याची कार अडवत त्याला बेदम मारहाण केली. कार मधील आणखी दोन तरुणांनी तेथून पलायन केले. त्यानंतर कारचालक कार घेऊन पोलीस ठाण्यात गेला.  रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.