पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैशाचे वाटप

पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर पैशाचे वाटप

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा: नाशिक शिक्षक मतदार संघाच्या महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.२२) जळगावात आले होते. येथील आदित्य लॉन येथे मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली. आधीच सभेला उशीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाल्यावर शिक्षक लोकांनी बाहेर जेवणाकडे जाण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री गेल्यानंतर या सभागृहात पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आले. याबाबतचा व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी ट्विटवर शेअर केला आहे.
नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक २६ जूनला होणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. ही सभा सायंकाळी सहा वाजता आदित्य लॉन येथे आयोजित करण्यात आली होती, मात्र तब्बल मुख्यमंत्री हे दोन तास उशिरा आले असल्याने या ठिकाणी शिक्षकांचा हिरमोड झाला. नऊ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते. सभेला उशीर झाल्याने काही कर्मचारी या ठिकाणाहून बाहेर पडले, मात्र सभा आटोपल्यानंतर परत सभेच्या ठिकाणी आले. या ठिकाणी त्यांना पैसे वाटण्यात करण्यात आल्याचा व्हिडिओ सुषमा आंधारे यांनी ट्विटरद्वारे शेअर केला आहे.